भारतीय संघ (team india) सध्या वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका खेळत आहे. उभय संघातील पहिल्या सामन्यात युवा फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) याने भारताच्या डावाची सुरुवात केली होती, पण दुसऱ्या सामन्यात मात्र त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले गेले. परंतु भारतीय संघाचा माजी फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा (Pragyan Ojha) याच्या मते ईशान किशन एकमेव असा खेळाडू आहे, जो आगामी विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडू शकतो.
ओझा म्हणाला की, “हे पाहा, ईशान किशनच तो एकमात्र खेळाडू आहे, ज्याला तुम्ही विश्वचषकासाठी योग्य पद्धतीने तयार करता येऊ शकते. मला नाहीय वाटत की, याव्यतिरिक्त ते लोक (संघ व्यवस्थापन) जास्त काही बदल करतील. याचे कारण असे आहे की, संघात असलेले सर्व खेळाडू युवा आणि नवीन आहेत. असे नाहीय की त्यांनी ४०-५० सामने खेळले आहेत किंवा ते खूप क्रिकेट खेळून आले आहेत आणि त्यांना विश्रांतीची गरज आहे. जर असे नाहीय आणि ते चांगले प्रदर्शन करत आहेत, तर माझ्या हिशोबाने तुम्ही ईशान किशनसारख्याच एखाद्या खेळाडूला संधी दिली पाहिजे.”
भारतीय संघाचे माजी फलंदाज अजय जडेजा यावेळी म्हणाले की, “कर्णधाराने सांगितले आहे की, शिखर पुनरागमन करेल. मला नाही वाटत की, त्याव्यतिरिक्त जास्त काही बदल करण्याची गरज आहे, कारण टूर्नामेंट (विश्वचषक) जास्त लांबही नाहीय आणि जास्त जवळही नाही. या सर्व खेळाडूंना एक किंवा दोन संधी दिल्या गेल्या आहेत, त्यामुळे त्या सर्वांना पुढेही संधी दिली जाईल. शक्यतो चहल ब्रेक घेऊ शकतो.”
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या सामन्यापूर्वी भारताच्या चार खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. या चार खेळाडूंमध्ये शिखर धवनचाही समावेश होता. तर उपकर्णधार केएल राहुल वैयक्तिक कारणास्तव पहिल्या सामन्यासाठी उपस्थित नव्हता. अशात ईशान किशनला रोहित शर्मासोबत सलामी करण्याची संधी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात केएल राहुलने संघात पुनरागमन केले आणि ईशान किशनला प्लेइंग इलेव्हनमधून जागा खाली करावी लागली.
केएल राहुलने जरी दुसरा सामना खेळला असला, तरी डावाची सुरुवात करण्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि रोहित शर्मा आले होते. मध्यक्रम भक्कम बनवण्यासाठी राहुल चौथ्या क्रमांकावर खेळला. तिसऱ्या सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करतील.
महत्वाच्या बातम्या –
यांचा विषयच खोल! भारतीय संघाकडून खेळत नसले, तरीही कोटीत पैसा कमावतात ‘हे’ शिलेदार
‘मराठमोळा’ ऋतुराज पुनरागमनासाठी सज्ज, कोरोनावर केली मात; पण तिसऱ्या वनडेत मिळणार का संधी?
धावांनंतर बाउंड्रीच्या विक्रमांतही विराट भल्याभल्यांवर सरस, सेहवागसह गेललाही सोडलंय पिछाडीवर