---Advertisement---

व्हिडिओ : सचिनच्या १००व्या शतकाची नववी वर्षपूर्ती, सहकार्‍यांनी केले खास सेलिब्रेशन

On: मंगळवार, मार्च 16, 2021 6:20 PM
---Advertisement---

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आजच्याच दिवशी ९ वर्षांपूर्वी जागतिक क्रिकेटमधील सगळ्यात अचंबित करणाऱ्या विक्रमाची नोंद केली होती. १६ मार्च २०१२ रोजी बांग्लादेशविरुद्ध आशिया कपमध्ये सचिनने शतक झळकवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००व्या शतकाला गवसणी घातली होती. असा विक्रम करणारा तो आजही जगातला एकमेव क्रिकेटपटू आहे.

या शतकाला ९ वर्षे उलटली असली तरी हे शतक आजही चाहत्यांच्या आणि खेळाडूंच्या स्मरणात आहे. मंगळवारी या विक्रमाला ९ वर्षे पूर्ण होताच भारताचा माजी खेळाडू प्रग्यान ओझाने एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात सचिनसह त्याचे माजी संघसहकारी या विक्रमाचा आनंद साजरा करत आहेत.

केक कापून केले सेलिब्रेशन  

सचिन तेंडुलकर सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज या स्पर्धेत इंडिया लिजेंड्सच्या संघाकडून सहभागी झाला आहे. या संघात सचिन व्यतिरिक्त वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, इरफान पठाण, युसफ पठाण यासारख्या माजी खेळाडूंचा समावेश आहे. माजी डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझा देखील या संघाचा भाग आहे.

मंगळवारी या संपूर्ण संघाने सचिनच्या १००व्या शतकाला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन केले. प्रग्यान ओझाने या सेलिब्रेशनचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओत सचिन त्याच्या साठीचा खास केक कापताना दिसून येत आहे. केक कापल्यानंतर युवराज सिंग हा केक सचिनला भरवताना दिसत आहे.

व्हिडिओ : सचिनच्या १००व्या शतकाची नववी वर्षपूर्ती, सहकार्‍यांनी केले खास सेलिब्रेशन

अनोख्या विक्रमाची ९ वर्षे 

१६ मार्च २०१२ साली एशिया कपमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बांग्लादेशविरूद्ध मिरपूर येथे झालेल्या सामन्यात हे शतक झळकावले होते. एशिया कप २०१२चा हा चौथा सामना होता. बांग्लादेशचा कर्णधार मुशफिकूर रहीमने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीला बोलवले. तेव्हा गौतम गंभीर सोबत सलामीला आलेल्या सचिनने १४७ चेंडूंचा सामना करताना ११४ धावा केल्या होत्या. त्यात १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

महत्वाच्या बातम्या:

केवळ बुमराहच नाही, तर या ५ क्रिकेटपटूंनाही स्पोर्ट्स अँकर्सने प्रेमाच्या पिचवर केलंय क्लिन बोल्ड

एप्रिल-मे महिन्यात मालदीव अप्रतिम असतं; राजस्थान रॉयल्सकडून बुमराहला लग्नाच्या भन्नाट शुभेच्छा

ईशानच्या पदार्पणावेळी घरात होते असे वातावरण; आई करत होती पुजा, तर वडील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---