पुणे, 24 डिसेंबर, 2023: कुंटे चेस अकादमी आणि मिलेनियम नॅशनल स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने व किंडर स्पोर्ट्स एलएलपी यांच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या मिलेनियम नॅशनल स्कुल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध वयोगटातील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या फेरी अखेर प्रथमेश शेरला, संदेश बजाज, अर्पित गजभिजे, अर्जुन कौलगुड यांनी आपापल्या गटात 5 गुणांसह आघाडी प्राप्त केली.
मिलेनियम स्कुल, कर्वेनगर येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत अनरेटेड गटात संदेश बजाजने अविनाश नेमाचा, तर, अर्पित गजभिजेने शिवम सिंगचा पराभव करून 5 गुण मिळवले. रेटेड गटात प्रथमेश शेरलाने अक्षय जोगळेकरचा पराभव करून 5 गुणांची कमाई केली.8 वर्षाखालील गटात अर्जुन कौलगुडने शौर्य सोनावणेवर विजय मिळवत 5गुण मिळवले. स्पर्धेचे उदघाटन पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, इंटरनॅशनल आरबीटर विवेक सोहनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चीफ आरबीटर दिप्ती शिदोरे, राजेंद्र शिदोरे आदी मान्यवर उपस्थित होते. (Prathamesh Sherla, Sandesh Bajaj, Arpit Gajbhije, Arjun Kaulgud lead at the end of the fifth round of open chess tournament)
निकाल: पाचवी फेरी(व्हाईट व ब्लॅक या नुसार):
रेटेड गट:
अक्षय जोगळेकर(3.5गुण) पराभुत वि. प्रथमेश शेरला(5गुण);
गौरव बकलीवाल(3.5गुण) बरोबरी वि. प्रतीती खंडेलवाल(4गुण);
प्रणव बुरली (4गुण) वि.वि.मार्मिक शहा(3गुण);
आर्यन करमळकर (4गुण) वि.वि.आरव धायगुडे (3गुण);
शिव व्यास(3गुण) पराभुत वि. सुयोग वडके (4गुण);
अनरेटेड गट:
अविनाश नेमा(4गुण) पराभुत वि. संदेश बजाज(5गुण);
अर्पित गजभिजे(5गुण) वि.वि.शिवम सिंग(4गुण);
सर्वेश औंधेकर (4.5गुण) वि.वि.चैतन्य इंगळे(3.5गुण);
सागर कोल्हे(4गुण) वि.वि.आदिती कुलकर्णी(3गुण);
आदित्य माझिरे (4गुण) वि.वि.अतुल भालेराव (3गुण);
8 वर्षाखालील गट:
शौर्य सोनावणे(4गुण)पराभुत वि. अर्जुन कौलगुड (5गुण);
विवान चिटणीस(3गुण) पराभुत वि.शिवम दातीर(4.5गुण);
अभेद्य दयामा (3.5गुण) बरोबरी वि. श्लोक शिंदे(4गुण);
शौर्य घेलाणी (4गुण) वि.वि.मांतिक अय्यर(3गुण);
रियांश पेरीवाल (3गुण)पराभुत वि. विराट दोडके (4गुण).
महत्वाच्या बातम्या –
IPL । 2015 नंतर सात आयपीएल हंगाम नाही खेळला मिचेल स्टार्क गोलंदाज, आता स्वतःच सांगितले कारण
22व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेस रविवारी सुरुवात