---Advertisement---

तुझी माझी जोडी जमली गं! अथियाच्या सेल्फीमध्ये राहुलची खास पोज, इंग्लंडमध्ये दिसले एकत्र

On: गुरूवार, जुलै 29, 2021 7:42 AM
---Advertisement---

सध्या भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर गेलेला आहे. या संघामध्ये वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुल देखील सहभागी आहेत. याचबरोबर इंग्लंड दौऱ्यावर खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबियानाही जाण्याची परवानगी मिळाली आहे. तर ईशांत शर्मासोबत पत्नी प्रतिमा सिंह इंग्लंड दौऱ्यावर गेलेली आहे. काही दिवसांपूर्वी ईशांत शर्माची पत्नी प्रतिमा सिंहने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे.

प्रतिमा सिंहने पोस्ट केलेल्या फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ईशांत शर्माची पत्नी प्रतिमा सिंह ईशांत शर्मा व्यतिरिक्त केएल राहुल, अथिया शेट्टी आणि रजत अरोडा दिसून येत आहेत. केएल राहुल आणि अथिया शेट्टीचा इंग्लंडमधील हा पहिला एकत्र फोटो आहे जो सर्वांसमोर आला आहे. जेव्हापासून भारतीय संघ इंग्लंड दौर्‍यावर गेला आहे तेव्हापासून अथिया देखील राहुलसोबत इंग्लंडमध्ये असल्याची नेहमी चर्चा होत होती.

प्रतिमाच्या फोटोवर राहुलने हार्ट इमोजी टाकले आहे. रजतबद्दल बोलायचे झाले तर, ती बीसीसीआय टीव्हीची ज्येष्ठ निर्माती आहे. हा फोटो शेअर करताना प्रतिमाने लिहिले की, ‘वाटेत त्यांच्यासोबत भेट झाली.’

https://www.instagram.com/p/CR1ZwbHsx21/?utm_source=ig_web_button_share_sheet

 

मागील काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने तिचे काही फोटो शेअर केले होते. त्या फोटोचे श्रेय तिने अथिया शेट्टीला दिले होते. केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या अफेअरच्या बातम्या बर्‍याचदा आल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CRvjK2WJs3n/?utm_source=ig_web_button_share_sheet

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना नॉटिंघॅममध्ये खेळला जाणार आहे. याच कसोटी मालिकेची सध्या भारतीय संघ तयारी करत आहे. या मालिकेपूर्वी खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात शतक ठोकून केएल राहुलने ११ खेळाडूंमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.

भारतीय संघ बर्‍याच दिवसांपासून इंग्लंडमध्ये आहे. जूनच्या सुरूवातीपासूनच हा संघ इंग्लंडमध्ये आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना १९ ते २३ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यानंतर भारतीय संघाला तीन आठवड्यांचा ब्रेक दिला होता. या ब्रेकनंतर संघातील सर्व खेळाडू १५-१६ जुलैला पुन्हा एकदा एकत्र येऊन सराव सुरू केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

याला म्हणायचे चपळाई! राहुल चाहरने सीमारेषेजवळ घेतलेल्या ‘त्या’ अफलातून झेलाचा व्हिडिओ व्हायरल

पहिल्याच सामन्यात पडिक्कलच्या नावे जमा झाला कधीही न मोडणारा विक्रम, वाचा सविस्तर

श्रेयस अय्यरने सुरु केली आयपीएलची तयारी, ‘या’ दिग्गजांकडून घेतोय प्रशिक्षण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---