---Advertisement---

एक पराभव पाकिस्तानला दाखवेल घरचा रस्ता, हाँगकाँगविरुद्ध ‘या’ 11 खेळाडूंसह उतरेल आझम

Pakistan-Hongkong
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान आणि हाँगकाँग हे संघ शुक्रवारी (02 सप्टेंबर) एकमेकांशी भिडणार आहेत. उभय संघातील हा सामना शारजाहच्या शारजाह क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. आशिया चषक 2022 मधील हा शेवटचा साखळी फेरी सामना असून या सामन्याच्या निकालानंतर सुपर-4 फेरीचे चित्र स्पष्ट होईल. हा सामना जिंकणारा संघ सुपर-4 फेरीसाठी पात्रता मिळवणारा चौथा संघ बनेल. तर पराभूत होणारा संघ थेट स्पर्धेतून बाहेर होईल.

या ‘करा वा मरा’ सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करू शकतो. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज नसीम शाह आणि हॅरिस राउफ यांना विश्रांती दिली जाऊ शकते. भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान या दोन्ही खेळाडूंना क्रॅम्प आला होता. त्यामुळे हाँगकाँगविरुद्ध हसन अली आणि मोहम्मद हसनैन यांना त्यांच्याजागी संधी दिली जाऊ शकते. तर हाँगकाँगच्या संघात बदलाच्या फार कमी शक्यता आहेत.

पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामन्याबद्दल सविस्तर माहिती
सामना: पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग
तारीख आणि वेळ: शुक्रवार 2 सप्टेंबर, संध्याकाळी 7.30 वाजता (नाणेफेक 7 वाजता)
स्थळ: शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स / डीडी स्पोर्ट्सवर भारतात लाईव्ह सामना पाहता येईल. डिझ्नी हॉटस्टारद्वारे मोबाईलवर लाइव्ह स्ट्रिमिंग होईल

पाकिस्तान आणि श्रीलंकेचे संपूर्ण संघ
पाकिस्तान:
मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, शादाब खान, आसिफ अली, मोहम्मद नवाज, हारिस रौफ, नसीम शाह, शाहनवाज डहानी, उस्मान कादिर, हसन अली, मोहम्मद हसनैन, हैदर अली

श्रीलंका:
दसुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, आशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महेश थीक्षाना, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, मथिशा पथिराना, दिलशान मदुशहन फर्नांडो, नुवान तुषारा, दिनेश चांदीमल

पाकिस्तान आणि श्रीलंका संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान:
बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), यासिम मुर्तजा, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, मोहम्मद हसनैन, शाहनवाज दहानी

हाँगकाँग:
यासिम मुर्तजा, निजाकत खान (कर्णधार), बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मैकीनी (यष्टीरक्षक), जीशान अली, हारून अरशद, एहसान खान, मोहम्मद घाजांफर, आयुष शुक्ला

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
नशीब बलवत्तर! श्रीलंकेच्या मेंडिसला 5 वेळा जीवनदान, मग थेट अर्धशतक करत ठरला मॅच विनर
चोरीचा मामला.. बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेची चिटिंग? ड्रेसिंग रूममध्ये पाठवण्यात आले सिक्रेट कोड
हिशोब बरोबर! 4 वर्षांपूर्वीचा सूड पूर्ण करत श्रीलंकेच्या खेळाडूंचा नागिन डान्स, सेलिब्रेशनची सर्वत्र चर्चा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---