इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. प्लेऑफसाठी चार संघांची नावे जाहीर झाली आहेत. पण यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाबच प्लेऑफपर्यंत मजल मारू शकला नाही. स्पर्धेच्या सुरुवातीला काही सामन्यात झालेल्या पराभवानंतर पंजाबने उत्कृष्ट कामगिरी बजावली पण तरीही हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. त्यानंतर सहसंघमालक प्रिती झिंटाने सोशल मीडियावरून चाहत्यांना भावुक संदेश दिला आहे.
प्रीतीने तिच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आणि लिहिले की “आयपीएल आणि युएईचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. या हंगामात आम्ही अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. परंतु पुढच्या वर्षी आम्ही अधिक चांगली कामगिरी करू आणि कणखर होऊ. बरेच रोमांचक आणि हृदयाचे ठोके वाढवणारे सामने झाले.हे संस्मरणीय क्षण आहेत. जसा विचार केला होता तसा लांब हा प्रवास नव्हता.”
https://twitter.com/realpreityzinta/status/1323712685284843520?s=20
यानंतर, प्रीती झिंटाने पुन्हा एक ट्विट केले आणि लिहिले की, किंग्ज इलेव्हन पंजाबच्या चाहत्यांचे आभार मानू इच्छिते.तुम्ही आमच्या संघासोबत नेहमीच उभे असतात. तुम्ही सर्वजण खूप चांगले आहात आणि आमच्या संघासाठी ही खूप महत्वाची बाब आहे.
https://twitter.com/realpreityzinta/status/1323712798484955136?s=20
यावर्षी पंजाबचे नेतृत्व भारतीय फलंदाज केएल राहुल करत होता. सुरुवातीच्या सामन्यात संघाला एकच विजय मिळवता आला.त्यामुळे राहुलच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. पण यानंतर पंजाब संघाने जोरदार पुनरागमन केले आणि सलग पाच सामने जिंकले आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत संघ टिकून राहिला.परंतु मागील दोन सामन्यात पराभूत झाल्यामुळे पंजाब आयपीएलकडून बाहेर झाला.






