प्रीमियर लीगच्या सामन्यावेळी स्टेडियम जरी रिकामे असले तरी टीव्हीच्या माध्यमातून क्लब्सना फायदाच होणार आहे. २०१६-१७च्या हंगामात या फुटबॉल क्लब्सने ८.३ बिलीयन पौंड टीव्हीच्या माध्यमातून कमवले होते.
२०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन हंगामात ज्या क्लब्सनी आधीच कर भरला होता यानांही त्याचा फायदा झाला.
In 2016/17 13 out of 20 #PremierLeague clubs earned 3/4 or more of their income from broadcasting rights. Why are kick off times changed so much? He who pays the piper calls the tune…and 'he' is Sky and BT. Broadcast income was £2,767m out of the EPL total of £4,571m pic.twitter.com/WgJ2S0HcP7
— Kieran Maguire (@KieranMaguire) August 14, 2018
बॉर्नमाऊथ हे प्रीमियर लीगमधील सर्वात छोटे स्टेडियम आहे. येथे फक्त ११,४५० लोकच बसू शकतात. तरीही या क्लबने २०१६-१७च्या हंगामात १३६.५ मिलियन पौंडचा व्यवसाय केला. त्यातील ५.२ मिलियन पौंड तिकीट विक्रीतील आहे.
मागच्या वर्षी २० पैकी १३ क्लब्सना याचा फायदा झाला. तसेच २०१६-१७ चाहत्यांविना फायदा झालेल्यांमध्ये लिसेस्टर पहिल्या स्थानावर असून त्यांना ७६.०३ मिलियन पौंडचा तर स्वॅन्सी सिटीने कमी असे ५.८९ मिलियन पौंड कमवले.
“२०१२मध्ये प्रक्षेपणाचा करार ३.०१ बिलीयन पौंडवर थांबला होता. तेव्हापासूनच प्रीमियर लीगमधील व्यवसायात बदल झाला”, असे शेफिल्ड हॅलम विद्यापीठ येथील आर्थिक तज्ञ डॉ. रॉब विलसन म्हणाले.
“जर तुम्हाला या लीगमध्ये एक शॉट मारून १२० मिलीयन पौंड मिळत असतील तर तुम्ही रिकाम्या स्टेडियममध्येही खेळू शकता”, असे विलसन पुढे म्हणाले.
“स्टेडियम भरण्यास खूप मेहनत करावी लागते कारण या सामन्यांचे टिकिट महाग असतात”, असे प्रीमियर लीगच्या अधिकाऱ्याने सांगितले. म्हणूनच स्वॅन्सी आणि वेस्ट हॅमने तिकीटांचे दर कमी केले आहेत.
“चाहतेच आमचे सर्वकाही आहेत पण टीव्हीच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक फायदा होतो”, असे स्वॅन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस पर्लमॅन म्हणाले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–आतंरराष्ट्रीय फूटबॉलमधून मेस्सी निवृत्त?
–यावर्षी पहा ला लीगाचे सामने फेसबुकवर मोफत