भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) पदक जिंकणाऱ्या खेळाडूंचे राष्ट्रपती भवनात स्वागत केले. यावेळी त्या म्हणाल्या की, “मी तुम्हा सर्वांचे येथे स्वागत करते. पॅरिस ऑलिम्पिकमधील तुमच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मी तुमचे अभिनंदन करते. माझ्यासाठी तुम्ही सर्व सुवर्णपदक विजेते आहात, आम्हा सर्वांना तुमच्या सर्वांचा अभिमान आहे.”
भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश आणि नेमबाज मनू भाकर (Manu Bhakar) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर आपले मत मांडले. यादरम्यान श्रीजेशनं पॅरिस ऑलिम्पिकमधील भारतीय हॉकी संघाचा प्रवास आठवला. तो म्हणाला की, “आमचा संघ चांगला खेळला, पण दुर्दैवाने आम्ही उपांत्य फेरीत हरलो.” याशिवाय कांस्यपदक जिंकणाऱ्या मनूला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मनू भाकर म्हणाली की, “टोकियो ऑलिम्पिक ते इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. पण आमच्या टीमने खूप मेहनत घेतली.”
VIDEO | President Droupadi Murmu meets Indian contingent for Paris Olympics at Rashtrapati Bhavan.#Olympics2024WithPTI #ParisOlympics2024
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/wvncIxLMre
— Press Trust of India (@PTI_News) August 14, 2024
VIDEO | Paris Olympics 2024: Former India hockey player PR Sreejesh (@16Sreejesh) and shooter Manu Bhaker (@realmanubhaker) interact with President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan.#Olympics2024WithPTI #ParisOlympics2024
(Full video available on PTI Videos -… pic.twitter.com/qO2k7NVGUT
— Press Trust of India (@PTI_News) August 14, 2024
यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic) स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. यावेळी भारतानं 6 पदकं जिंकली. दरम्यान मनू भाकरनं (Manu Bhakar) 2 पदक मिळवली. मनूनं एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदकं जिंकून इतिहास रचला. तर भारताचा गोल्डन बाॅय नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यात अयशस्वी राहिला. त्यानं भालाफेकमध्ये सिल्वर मेडल मिळवलं.
महत्त्वाच्या बातम्या-
दुलीप ट्राॅफीसाठी 4 संघ जाहीर…! पंत-सूर्या नाही, तर ‘या’ स्टार खेळाडूंना मिळाले कर्णधारपद
विनेश फोगट भारतात कधी परतणार? मेडल सोबत असेल की नाही? सर्वकाही जाणून घ्या
भारतीय संघात संधी मिळेना, स्टार फिरकीपटूनं धरली इंग्लंडची वाट