---Advertisement---

दुलीप ट्राॅफीसाठी 4 संघ जाहीर…! पंत-सूर्या नाही, तर ‘या’ स्टार खेळाडूंना मिळाले कर्णधारपद

---Advertisement---

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या देशांतर्गत युनिटनं 2024च्या दुलीप ट्रॉफीसाठी (Duleep Trophy) चार संघ जाहीर केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या देशांतर्गत स्पर्धेत खेळणार नाहीत, तर याआधी या दोघांची दुलीप ट्रॉफीमध्ये निवड होणार असल्याच्या बातम्या होत्या. शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि अभिमन्यू इसवरन यांना या स्पर्धेत कर्णधारपद मिळाले आहे.

यंदाच्या दुलीप ट्राॅफीमध्ये भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. त्यामध्ये रिषभ पंत, रवींद्र जडेजा, केएल राहुल, मोहम्मद सिराज, इशान किशन, सरफराझ खान, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिवम दुबे, तिलक वर्मा, आवेश खान, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार यांचा समावेश आहे. यंदाच्या दुलीप ट्राॅफीमध्ये फक्त 4 संघ खेळताना दिसणार आहेत.

देशांतर्गत क्रिकेटसाठी जाहीर झालेले 4 संघ-

भारत-अ संघ- शुबमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसीद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, विद्वत कावरप्पा, कुमार कुशाग्र, शास्वत रावत.

इंडिया-ब संघ- अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, सरफराझ खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन (यष्टीरक्षक).

इंडिया-क संघ- रुतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सुथार, उमरान मलिक, वैशाक विजयकुमार, अंशुल खांबोज, हिमांशू मार्कन, मयांश मार्कनडे, आर्यन जुयाल (यष्टीरक्षक), संदीप वॉरियर.

इंडिया-डी संघ- श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन (यष्टीरक्षक), रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (यष्टीरक्षक), सौरभ कुमार

महत्त्वाच्या बातम्या-

विनेश फोगट भारतात कधी परतणार? मेडल सोबत असेल की नाही? सर्वकाही जाणून घ्या
भारतीय संघात संधी मिळेना, स्टार फिरकीपटूनं धरली इंग्लंडची वाट
हार्दिक पांड्या पुन्हा डेट करतोय? कोण आहे सोशल मीडिया स्टार जास्मिन वालिया?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---