स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलला गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियामध्ये फारशा संधी मिळालेल्या नाहीत. चहल 2024 टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा सदस्य होता. मात्र त्याला स्पर्धेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यामुळे आता त्याच्या कारकिर्दीवर प्रश्न उभे राहिले आहेत. त्यानंतर आता चहलनं नियमित क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. चहल आता इंग्लंडमधील एका संघाकडून खेळताना दिसणार आहे.
युझवेंद्र चहल काउंटी चॅम्पियनशिपच्या उर्वरित पाच सामन्यांसाठी नॉर्थम्प्टनशायर संघात सामील झाला आहे. चहल काउंटी क्रिकेट क्लबच्या संघात सामील झाल्याची बातमी नॉर्थम्प्टनशायरनं प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली. नॉर्थहॅम्प्टनशायरचे मुख्य प्रशिक्षक जॉन सॅडलर चहलला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी उत्साहित आहेत. चहल क्लबच्या गोलंदाजी आक्रमणाला अधिक बळ देईल, असं ते म्हणाले. “युझवेंद्र चहल हा एक हाय प्रोफाइल आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. त्याच्याकडे खूप अनुभव आणि अविश्वसनीय कौशल्यं आहेत. त्याचे रेकॉर्ड सगळं काही सांगतात. त्याच्या विकेट घेण्याच्या क्षमतेमुळे आमच्या गोलंदाजी आक्रमणाला अधिक बळ येईल”, असं ते म्हणाले.
Welcome to Northamptonshire, @yuzi_chahal! 🏵️
The Indian spinner will be available for all remaining @CountyChamp fixtures and today’s @onedaycup game against Kent. 🌪️
Read more 👉 https://t.co/bLMrdJEv4L pic.twitter.com/rE5cJmGyyO
— Northamptonshire Steelbacks (@NorthantsCCC) August 14, 2024
युजवेंद्र चहल टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्यानं आतापर्यंत टीम इंडियासाठी 80 टी20 सामन्यांमध्ये 96 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय चहलनं आयपीएलमध्ये 200 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. ही कामगिरी करणारा तो आयपीएलमधील पहिला आणि एकमेव गोलंदाज आहे. चहलनं आयपीएलच्या 160 सामन्यांमध्ये 205 विकेट घेतल्या आहेत.
युझवेंद्र चहलनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये देखील टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं भारतासाठी खेळलेल्या 72 एकदिवसीय सामन्यांमध्ये 121 विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा –
हार्दिक पांड्या पुन्हा डेट करतोय? कोण आहे सोशल मीडिया स्टार जास्मिन वालिया?
ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्व! दुलीप ट्रॉफीसाठी 4 संघांची घोषणा
मुंबई इंडियन्सला रोहितच्या अटी मान्य, कर्णधार बदलणार?