रविवारी (दि. 18 डिसेंबर) कतारमधील लुसेल स्टेडीयम येथे फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला गेला. अर्जेंटिना आणि फ्रांस संघात रोमहर्षक सामना बघायला मिळाला. या सामन्यात असा एक क्षण बघायला मिळाला ज्याने जगातील प्रत्येक फुटबॉल चाहत्याला आनंद होईल. आपल्या संघाला जिंकताना बघायची प्रत्येकाची ईच्छा असते आणि जर आपला संघ सामन्यात बराच मागे असताना पुन्हा सामन्यात कमबॅक केला तर त्या संघाचा चाहता नाचल्याशिवाय राहणार नाही. अशीच एक घटना फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बघायला मिळाली. फ्रांसच्या संघाने सलग दोन केल्यानंतर फ्रांसचे पंतप्रधान इमॅन्यूअल मॅक्रॉन चक्क आनंदाने नाचायला आणि जल्लोष करताना दिसले.
अर्जेंटिना आणि फ्रांस यांच्या दरम्यान खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिना 2-0ने आघाडीवर होता. प्रेक्षकांना असे वाटत होते की फ्रांस या सामन्यात बराच मागे पडला आहे. मात्र त्याच क्षणी 80000प्रेक्षकांसमोर चमत्कार घडला. सामन्याच्या 80व्या आणि 81व्या मिनिटाला फ्रांसच्या कायलियन एमबाप्पे याने गोल करत सामना बरोरीत आणला. त्याने या लागोपाठ दोन गोलने अर्जेंटिनाच्या तोंडचा घास पळवला. यावेळी फ्रांसचे पंतप्रधानही स्टेडीयममध्ये उपस्थित होते. हे दोन गोल झाल्यानंतर त्यांनी उस्फुर्तपणे जल्लोष केला. त्यांचा हा जल्लोष बघण्यासारखा होती.
सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिना संघाने फ्रांसवर 2-0ने आघाडी मिळवली होती. अर्जेंटिनाकडून लिओनल मेस्सी याने 23व्या मिनिटाला तर ऐंजल डी मारिया याने 36व्या मिनिटाला गोल केले. सामना संपायाला 10 मिनिट बाकी असताना फ्रांसच्या कायलियन एमबाप्पे याने 80व्या आणि 81व्या मिनिटाला सगल दोन गोल केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर बांगलादेश संघात बदल, दुसऱ्या सामन्यात ‘या’ खेळाडूला मिळणार पदार्पणाची संधी
तेरा घर जाईंगा इसमे! फीफा विश्वचषकाच्या तिकीटाची किंमत ऐकून बसेल धक्का, एकदा वाचाच