मागील महिन्यात 5 ऑक्टोबर रोजी सुरू झालेला क्रिकेटचा कुंभमेळा अर्थातच आयसीसी वनडे विश्वचषक 2023 अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. स्पर्धेचे 45 साखळी सामने पार पडले आहेत. त्यानंतर आता स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात यजमान भारत आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने येत आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुधवारी (15 नोव्हेंबर) हा सामना खेळला जाईल.
संपूर्ण विश्वचषकात सातत्यपूर्ण कामगिरी करत सर्व नऊ सामने जिंकत भारतीय संघाने सर्वप्रथम उपांत्य फेरीत धडक मारली होती. तर, न्यूझीलंड संघाने सर्वात अखेरीस चौथ्या स्थानी राहत उपांत्य फेरीत जागा बनवली. त्यामुळे आता या दोन संघांदरम्यान हा सामना होईल.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमर होणाऱ्या या सामन्यात मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला या सामन्यात अधिक धावा करण्याची संधी असेल. दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला मात्र वेगवान गोलंदाजांना काहीशी मदत त्यामुळे एक उत्कृष्ट सामना पाहायला मिळू शकतो. विश्वचषक 2019 मध्ये न्यूझीलंड संघानेच भारताला उपांत्य फेरीत पराभूत केले होते. त्यामुळे त्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी भारतीय संघाकडे असेल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी दोन वाजता हा सामना सुरू होईल. स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवरून सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. डिज्नी प्लस हॉटस्टार हे लाईव्ह स्ट्रीमिंग करतील.
उपांत्य सामन्यासाठी संभाव्य संघ:
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड- डेवॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विलियम्सन (कर्णधार), डेरिल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅंटनर, मार्क चॅपमन, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट व लॉकी फर्ग्युसन.
(Preview India v Newzealand Semi Final ODI World Cup 2023)
हेही वाचा-
IND vs NZ सेमीफायनलपूर्वी आली विलियम्सनची प्रतिक्रिया; म्हणतो, ‘ही तर फक्त एक दिवसाची…’
‘मान्य करावंच लागेल, सेमीफायनलमध्ये दबाव…’, कोच द्रविडचे न्यूझीलंडशी भिडण्यापूर्वी मोठे विधान






