श्रीलंके विरूद्ध कसोटीतील निर्भेळ यशानंतर भारत रविवारी २० ऑगस्टला एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, डांबुला येथे खेळणार आहे. श्रीलंका कसोटी मालिकेतील पराभव विसरण्याचा प्रयत्न करेल तर भारत कसोटी मालिकेप्रमाणेच एकदिवसीय मालिकेतही आपला दबदबा राखण्याचा प्रयत्न करेल.
कसोटी प्रमाणेच आयसीसी क्रमवारीत श्रीलंका भारतापेक्षा खूप मागे आहे. कसोटीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे तर श्रीलंका सातव्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे तर श्रीलंका आठव्या क्रमांकावर आहे. या दोन संघातील तफावत या क्रमवारीवरून चटकन दिसून येते.
महत्वाचे खेळाडू
श्रीलंका: लसिथ मलिंगा
एका षटकात लागातार ६ यॉर्कर्स टाकण्याची क्षमता असलेल्या मलिंगाकडून श्रीलंकेला विशेष अपेक्षा असणार आहे. श्रीलंकेच्या या वाघाचे जरी वय झाले आले तरी अजूनही त्याच्याकडे क्षमता आहे की भारतीय फलंदाजांना त्रास देऊ शकतो. डांबुला येथे मलिंगा आपला२०० वा एकदिवसीय सामना असणार आहे. आजपर्यंत श्रीलंकेसाठी त्याने एकदिवसीय सामन्यात २९८ विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांनाच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.
भारत: विराट कोहली
श्रीलंका आणि भारत मालिका असेल आणि विराट कोहलीच नाव घेतलं जाणार नाही असं कस शक्य आहे. विराटने आतापर्यंत श्रीलंकेविरुद्ध ४१ सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ५४ च्या सरासरीने १८५६ धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरूद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट पाचव्या क्रमांकावर आहे.
भारताला जर मलिंगाच्या भेदक गोलंदाजीला चांगले प्रतिउत्तर द्यायचे असेल तर भारताच्या या स्टार खेळाडूला चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. तसेच विराट श्रीलंकेविरुद्ध प्रथमच भारताचे नेतृत्व करत आहे.
खेळपट्टीचे अनुमान
रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम हे श्रीलंकेमधील नवीन मैदानापैकी एक आहे. या मैदानातील खेळपट्टी एकंदरीत गोलंदाजांसाठी अनुकूल असेल. पहिल्या सत्रात वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीतून जास्त मदत मिळेल तेव्हा खेळपट्टीमधे ओलावा जास्त असतो तर संध्यकाळी खेळपट्टी वळल्यानंतर फिरकी गोलंदाजांना मदत होईल.
मागील ५ सामन्यांचा निकाल
श्रीलंका
हार, हार, विजय, विजय, हार
भारत
विजय, हार, विजय, विजय,अनिर्णित
संभाव्य संघ यातून निवडला जाणार:
श्रीलंका: उपुल थरंगा (कर्णधार), निरोशान डिकवेल, दानुस्का गुनाथिलका, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, चामरा कपुगेदेदरा, मिलिंडा सिरीवाडाना, मलिंडा पुष्पकुमार, अकिला दानंजय, लक्ष्मण संदकन, थिसारा परेरा, वनिदु हसरंगा, लसिथ मलिंगा, दुश्मांथा चामेरा, विश्व फर्नांडो
भारत: लोकेश राहुल, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, मनीष पांडे, केदार जाधव, यज्वेंद्र चहल, हर्डिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रित बूमरा, अक्षर पटेल