वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 31 वा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या दरम्यान खेळला जाणार आहे. कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना होईल. दोन्ही संघांना उपांत्य फेरीसाठीच्या आपल्या अगदी अंधुक असलेल्या आशा तशाच ठेवायच्या असतील तर या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे असेल.
एकवेळ विश्वचषकाचे दावेदार म्हणून सहभागी झालेल्या पाकिस्तान संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर त्यांना सलग चार सामन्यात पराभूत व्हावे लागले. दुसरीकडे बांगलादेश संघाने देखील आपल्या सहा सामन्यात केवळ एकच विजय मिळवला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी या दोन्ही संघांना विजय मिळवणे अनिवार्य असेल.
ईडन गार्डन येथे होणाऱ्या या सामन्यात फलंदाजांना पोषक वातावरण मिळू शकते. या मैदानावर याआधी झालेल्या बांगलादेश विरुद्ध नेदरलँड या सामन्यात नेदरलँड संघाने विजय मिळवला होता. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ विजयी होईल याकडे सर्वांचे लक्ष असेल.
उभय संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
पाकिस्तान- अब्दुल्ला शफीक, फखर झमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सलमान आगा, मोहम्मद नवाझ, शादाब खान, इफ्तिखार अहमद, शाहिन आफ्रिदी, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्यू.
बांगलादेश- लिटन दास, तंझीद हसन, नजमुल हसन शांतो, मेहदी हसन मिराज, शाकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकूर रहीम, महमदुल्लाह, मेहदी हसन, शोरीफुल इस्लाम, तस्किन अहमद व मुस्तफिझूर रहमान
(Preview Pakistan v Bangladesh ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
मैं हू ना! कुलदीपने चाहत्यांना सांगून उडवलेल्या बटलरच्या दांड्या
महाराष्ट्र U19 संघ बनला विनू मंकड ट्रॉफीचा चॅम्पियन! अर्शिन कुलकर्णीचे शानदार शतक, मुंबई पराभूत