ऑस्ट्रेलियामध्ये सध्या 7 वा महिला टी20 विश्वचषक सुरु आहे. या विश्वचषकात आज(24 फेब्रुवारी) भारतीय महिला संघाचा सामना बांगलादेश महिला संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन ग्राऊंड, पर्थ येथे होणार आहे.
आजच्या सामन्यात भारतीय संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. कारण भारताने या विश्वचषकाची सुरुवात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करत विजयाने केली होती. पण असे असले तरी बांगलादेशला कमजोर समजण्याची चूक भारताला करुन चालणार नाही. कारण बांगलादेशने याआधी 2018च्या आशिया चषकात भारताला 2 वेळा पराभूत केले आहे.
तसेच आत्तापर्यंत भारतीय महिला संघ आणि बांगलादेश महिला संघ आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 11 वेळा आमने-सामने आला आहे. त्यातील 9 सामने भारताने जिंकले आहेत तर बांगलादेशने 2 सामने जिंकले आहेत.
आजच्या सामन्यात भारतीय संघाला आपल्या फलंदाजीवर जास्त भर द्यावा लागणार आहे. कारण भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजीत प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. भारतीय संघाला केवळ 132 धावाच करता आल्या होत्या.
पण त्या सामन्यात पुनम यादवसह अन्य गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीमुळे भारताने तो सामना 17 धावांनी जिंकला होता. आजच्या सामन्यातही भारतीय गोलंदाजांना कामगिरीत सातत्य राखावे लागेल.
त्याचबरोबर आजचा बांगलादेशचा यावर्षीच्या विश्वचषकातील पहिलाच सामना आहे. त्यामुळे बांगलादेशचा आज विजयी सुरुवात करण्याचा इरादा असेल. तर भारतीय संघ सलग दुसरा विजय मिळवत उपांत्य फेरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल.
तसेच आजचा भारत-बांगलादेशमधील हा सामना ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध श्रीलंका महिला संघातील सामना संपल्यानंतर सुरु होणार आहे. कारण ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचा सामनाही पर्थलाच आज भारतीय प्रमाणवेळेनुसार 12.30 वाजता सुरु होणार आहे.
महिला टी20 विश्वचषकात आज होणाऱ्या भारतीय महिला विरुद्ध बांगलादेश महिला संघात होणाऱ्या सामन्याबद्दल सर्वकाही…
कधी होणार भारतीय महिला विरुद्ध बांगलादेश महिला संघाचा सामना?
– भारतीय महिला विरुद्ध बांगलादेश महिला संघात होणारा महिला टी20 विश्वचषकातील सामना सोमवारी (24 फेब्रुवारी) होणार आहे.
कुठे होणार आहे भारतीय महिला विरुद्ध बांगलादेश महिला संघाचा सामना?
– भारतीय महिला विरुद्ध बांगलादेश महिला संघात होणारा महिला टी20 विश्वचषकातील सामना वेस्टर्न ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन, पर्थ येथे होणार आहे.
किती वाजता सुरु होणार भारतीय महिला विरुद्ध बांगलादेश महिला संघाचा सामना?
– भारतीय महिला विरुद्ध बांगलादेश महिला संघात होणारा महिला टी20 विश्वचषकातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 4.30 वाजता सुरु होईल.
कोणत्या चॅनेलवर पाहता येणार भारतीय महिला विरुद्ध बांगलादेश महिला संघाचा सामना?
– भारतीय महिला विरुद्ध बांगलादेश महिला संघात होणारा महिला टी20 विश्वचषकातील सामना स्टार नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे.
भारतीय महिला विरुद्ध बांगलादेश महिला संघाचा सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
– भारतीय महिला विरुद्ध बांगलादेश महिला संघात होणारा महिला टी20 विश्वचषकातील सामना हॉटस्टार या वेबसाईटवर ऑनलाईन पाहता येणार आहे.
यातून निवडले जातील 11 जणांचे संघ –
भारतीय महिला संघ –हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधना, जेमिमा रोड्रिगेज, दीप्ति शर्मा, शेफाली वर्मा, पूनम यादव, राधा यादव, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), हर्लीन देओल, राजेश्वरी गायकवाड, ऋचा घोष, वेदा कृष्णमूर्ति, शिखा पांडे, अंरुधति रेड्डी, पूजा वस्त्राकर.
बांगलादेश महिला संघ – सलमा खातून (कर्णधार), रूमाना अहमद, आयेशा रहमान, फहीमा खातून, फरजाना हक, जहांआरा आलम, खादीजा तुल कुबरा, शोभना मोस्तरी, मुर्शीदा खातून, नाहिदा अख्तर, निगार सुल्ताना (यष्टीरक्षक), पन्ना घोष, ऋतु मोनी, संजीदा इस्लाम, शमीमा सुल्ताना.
१०० वा कसोटी विजय मिळवूनही न्यूझीलंडच्या नावावर झाला हा नकोसा विक्रम
वाचा👉https://t.co/Dw8PBaKxfJ👈#म #मराठी #cricket #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 24, 2020
…म्हणून पहिल्या कसोटीत १०० हा आकडा न्यूझीलंडसाठी ठरला महत्त्वाचा
वाचा👉https://t.co/GqxeVx0bGQ👈#म #मराठी #cricket #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 24, 2020