वनडे विश्वचषक 2023 वनडे विश्वचषक अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) खेळला गेला. यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. भारतीय संघ या प्रभावामुळे निराश झालेला असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामन्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. त्यांनी भारतीय संघाच्या खेळाडूंचा उत्साह वाढवला. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने याबाबत ट्विट केले आहे.
अंतिम सामन्यात भारतीय संघ फारसा प्रतिकार करू शकला नाही व त्यांना एकतर्फी पराभव पत्करावा लागला. या सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. सामना समाप्त झाल्यानंतर निराश असलेल्या भारतीय संघाची त्यांनी भेट घेतली. त्यांनी सर्व खेळाडूंना मान उंच ठेवण्याचा सल्ला दिला. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला जवळ घेत प्रोत्साहन दिले. शमीने याबाबत ट्विट करत माहिती दिली.
Unfortunately yesterday was not our day. I would like to thank all Indians for supporting our team and me throughout the tournament. Thankful to PM @narendramodi for specially coming to the dressing room and raising our spirits. We will bounce back! pic.twitter.com/Aev27mzni5
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) November 20, 2023
पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला विश्वचषक प्रदान करण्यात आला. त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान देखील हजर होते.
अंतिम सामन्याविषयी बोलायचे झाल्यास, भारतीय संघाने विराट कोहली व केएल राहुल यांच्या अर्धशतकांमुळे 241 धावा उभ्या केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 43 षटकातच सामना संपवला. भारतीय गोलंदाजांनी फक्त 47 धावांवर ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानंतर ट्रेविस हेड याने 137 धावांची शतकी खेळी व त्याला मार्नस लॅब्युशेन याने नाबाद अर्धशतक करून साथ दिल्याने ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून विजय मिळवला.
(Prime Minister Narendra Modi with Shami after a painful defeat in World Cup final)
हेही वाचा-
पराभवानंतर खचलेल्या भारताचा गंभीरने वाढवला कॉन्फिडन्स; ट्वीट करत म्हणाला, ‘मी आधीच म्हणालोय आपण…’
‘तुझं रडणं मनाला लागलं, पण तू…’, रोहितचा मान खाली घालून चालतानाचा व्हिडिओ पाहून हळहळला चाहता; पाहा