भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने नुकताच आपला ३१ वा वाढदिवस साजरा केला. सूर्यकुमार यादवचा जन्म १४ सप्टेंबर १९९० रोजी झाला होता. सध्या तो इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठी युएईमध्ये आहे. सूर्यकुमार यादवच्या या खास दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी संघातील खेळाडूंसह आणखी काही दिग्गज खेळाडूंनी त्याला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पृथ्वी शॉ आणि इरफान पठाण यांनी देखील त्याला हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.
पृथ्वी शॉ ने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने सूर्यकुमार यादवचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सूर्यकुमार यादवने मुलींच्या चेहऱ्याच्या फिल्टर वापरला आहे. दरम्यान दोन वेणी आणि शाळेच्या गणवेशात सूर्यकुमार यादव खूप क्यूट दिसत आहे. दोघेही मुंबईसाठी गेली अनेक वर्ष एकत्र क्रिकेट खेळत आहेत, त्यामुळे दोघांची मैत्री खूप घट्ट झाली आहे.

पृथ्वी शॉ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो नेहमीच मजेशीर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. काही दिवसांपूर्वी पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांनी बाजीगर चित्रपटातील एक कॉमेडी डायलॉगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, जो चाहत्यांच्या पसंतीचा ठरला होता. तसेच दोघांनी ही श्रीलंका दौऱ्यावर अप्रतिम कामगिरी केली होती. ज्यामुळे त्यांना इंग्लंड संघाविरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेसाठी बोलावून घेण्यात आले होते. (Prithvi shaw and irfan pathan wishes suryakumar yadav on his birthday)
https://www.instagram.com/reel/CScHfNIoq_b/?utm_medium=copy_link
https://www.instagram.com/reel/CSrAPa6HgHn/?utm_medium=copy_link
तसेच भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने देखील खास अंदाजमध्ये सूर्यकुमार यादवला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर मोकळ्या आकाशाचा फोटो शेअर केला आहे.
https://twitter.com/IrfanPathan/status/1437685971353366529?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1437685971353366529%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fsports.punjabkesari.in%2Fsports%2Fnews%2Fprithvi-shaw-and-irfan-pathan-wish-suryakumar-on-his-birthday-in-a-unique-way-1456468
https://twitter.com/ICC/status/1437612859861655555?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1437612859861655555%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fsports.punjabkesari.in%2Fsports%2Fnews%2Fprithvi-shaw-and-irfan-pathan-wish-suryakumar-on-his-birthday-in-a-unique-way-1456468
त्याने हा फोटो शेअर करण्याचे कारण म्हणजे सूर्यकुमार यादवला ‘स्काय’ म्हणून बोलवले जाते. ‘स्काय’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ आकाश असा होतो. त्यामुळेच इरफान पठाणने हा फोटो शेअर केला आहे. तसेच आयसीसीने देखील आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर सूर्यकुमार यादवचा फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सीपीएल स्पर्धा गाजवल्यानंतर विराटचा ‘हा’ भिडू आयपीएल गाजवण्यास सज्ज, पाहा कशी राहिली आहे कामगिरी
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेले ‘तीन’ शिलेदार, कोणालाही नव्हती अपेक्षा