भारतीय संघाचा धाकड फलंदाज पृथ्वी शॉ याला त्याच्या विस्फोटक खेळीसाठी ओळखले जाते. परंतु तो सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. आयपीएल २०२२ मधील सरासरी प्रदर्शनानंतर रणजी ट्रॉफीमध्येही तो फेल ठरताना दिसत आहे. आपल्या क्रिकेटमधील प्रदर्शनाखेरीज तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेचा विषय ठरत असतो. अशात आता वृत्त येत आहे की, पृथ्वी शॉचे त्याची कथित प्रेयसी प्राची सिंगसोबत ब्रेकअप झाले आहे.
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि प्राची (Prachi Singh) यांच्या सोशल मीडिया एक्टिव्हिटीजवरून त्यांच्यातील जवळीकतेचा अंदाज लावता येतो. हे दोघेही एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टला लाईक करताना दिसत असतात. बऱ्याचदा पृथ्वी शॉच्या एखाद्या चांगल्या खेळीनंतर प्राची इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवत त्याचे कौतुक करतानाही दिसते. परंतु आता असे समजत आहे की, या दोघांचे ब्रेकअप (Prithvi Shaw Breaks Up With Prachi Singh) झाले आहे.
खरोखरच पृथ्वी शॉ आणि प्राची सिंगचे ब्रेकअप झालेय का
प्राची इंस्टाग्रामवर २०० लोकांना फॉलो करते, त्यापैकी पृथ्वी शॉदेखील एक होता. परंतु आता प्राचीने पृथ्वी शॉला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, फक्त प्राचीनेच नव्हे तर पृथ्वी शॉनेही तिला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केले आहे. यानंतर असा अंदाज वर्तवला जात आहे की, या दोघांचे ब्रेकअप झाले आहे. पृथ्वी शॉ इंस्टाग्रामवर २४५ लोकांना फॉलो करतो.
कोण आहे प्राची सिंग
पृथ्वी शॉची कथित प्रेयसी प्राची सिंगचे नाव टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. ती नेहमी तिच्या बेली डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने २०१९ साली मनोरंजन इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. तिने कलर्स टीव्हीवरील उडान या कार्यक्रमात वंशिका शर्माची भूमिका निभावली होती. ती एका चांगल्या अभिनेत्रीसोबत दमदार नृत्यांगणाही आहे. सोशल मीडियावर ती नेहमी तिच्या डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असते.
पृथ्वी शॉ खराब फॉर्ममधून जातोय
पृथ्वी शॉने आयपीएल २०२२मध्ये १० सामने खेळताना २८.३०च्या सरासरीने २८३ धावा केल्या आहेत. त्याचे मागच्या हंगामातील प्रदर्शन पाहता ही कामगिरी सुमार होती. तसेच यानंतर रणजी ट्रॉफीतही तो खास प्रदर्शन करताना दिसलेला नाही.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘बायकोला कुठं सोडू?’, बसमध्ये चल म्हणणाऱ्या नेहराला चहलचे प्रत्युत्तर; एकदा पाहाच
वाढदिवस विशेष : आपल्या अचाट वेगाने प्रतिस्पर्धी फलंदाजांना धडकी भरवणारा शेन बॉन्ड