---Advertisement---

पृथ्वी ‘शो’ सुरूच! षटकार-चौकारांचा पाऊस पाडत ठोकले वादळी शतक; मुंबई 20 षटकात 3 बाद 230

On: शुक्रवार, ऑक्टोबर 14, 2022 12:55 PM
---Advertisement---

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा 2022-2023 हंगाम सुरू आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीच्या एलिट ए गटात मुंबई आणि आसाम यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. डोमेस्टिक जायंट मुंबईने प्रथम फलंदाजी करताना अक्षरशः आसामच्या गोलंदाजांचे वाभाडे काढले. सलामीवीर पृथ्वी शॉने आपला शानदार फॉर्म कायम राखत झंझावाती शतक झळकावले.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1580813503996170241?t=Rcur1BE_NgcZ1ft1V07GDw&s=19

 

राजकोट येथे झालेल्या या सामन्यात मुंबईला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. मुंबईसाठी या सामन्यात मुंबईचे नेतृत्व करत असलेल्या पृथ्वी शॉ याने अमन खान याच्यासह सलामी दिली. मागील दोन सामन्यात वादळी खेळी करणाऱ्या पृथ्वीने या सामन्यातही आपला तोच फॉर्म कायम राखला. त्याने अक्षरशः एकहाती आसामची गोलंदाजी फोडून काढली. पृथ्वी व अमन यांनी 3.1 षटकात 41 धावांची सलामी दिली. अमन बाद झाल्यानंतर पृथ्वीने यशस्वी जयस्वालला साथीला घेत आसामच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. 19 चेंडूंवर त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर अवघ्या 46 चेंडूंमध्ये त्याने आपले टी20 शतक झळकावले. बाद होण्यापूर्वी त्याने ‌‌‌‌‌61 चेंडूंमध्ये 13 चौकार व 9 उत्तुंग षटकारांच्या मदतीने 134 धावांची तुफानी खेळी केली. जयस्वालने 30 चेंडूवर 42 धावांचे योगदान दिले. अखेर सरफराज खान व शिवम दुबे यांनी अनुक्रमे 15 व 17 धावा करत मुंबईला निर्धारित 20 षटकात 3 बाद 230 पर्यंत पोहोचवले.

पृथ्वी शॉने स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यातही अशाच प्रकारे खेळ दाखवला होता. मिझोरामविरुद्ध त्याने 34 चेंडूंवर 55 व मध्य प्रदेशविरुद्ध 12 चेंडूत 29 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या. भारतीय संघाने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळली. चांगल्या कामगिरीनंतरही या मालिकेसाठी आपला विचार न झाल्याने पृथ्वी निराश झाला होता. त्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट करत आपले दुःख व्यक्त केलेले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भविष्यात भारत-पाकिस्तान क्रिकेट संघ द्विपक्षीय मालिकेत आमनेसामने येतील का? घ्या जाणून
टी२० विश्वचषकातील पाच ‘सिक्सर किंग्स’; युवी दुसऱ्या स्थानी तर ‘हा’ दिग्गज अव्वल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---