---Advertisement---

टीम इंडियातून बाहेर केलेल्या ‘या’ खेळाडूने शतकासह दिले निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर

On: सोमवार, फेब्रुवारी 22, 2021 7:27 PM
Prithvi Shaw and Mayank Agarwal
---Advertisement---

कोरोना महामारीनंतर भारतातील क्रिकेट मैदाने पुन्हा एकदा भरू लागली आहेत. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या यशस्वी आयोजनानंतर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळली आहे. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमधील वनडे क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा विजय हजारे ट्रॉफीदेखील विविध मैदानांवर सुरू झाली आहे. त्याचवेळी, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून डावलल्या गेलेल्या एका खेळाडूने विजय हजारे ट्रॉफीमध्ये तूफानी शतक झळकावत, निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

या खेळाडूंने झळकावले शतक

विजय हजारे ट्रॉफीतील एलिट ड गटातील सामने जयपूर येथील जयपुरिया महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू आहेत. ज्यामध्ये मुंबई विरुद्ध दिल्ली या सामन्यात मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने ८९ चेंडूंमध्ये १०५ धावा काढत आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला. अनुभवी सूर्यकुमार यादवने ३३ चेंडूत नाबाद ५० धावांची खेळी केली. दिल्लीने दिलेल्या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग मुंबईने तीन गडी गमावत ३१.५ षटकात केला. दिल्लीकडून हिम्मत सिंगचे शतक व्यर्थ गेले.

सध्या संघाबाहेर आहे पृथ्वी

पृथ्वी शॉ भारताच्या कसोटी संघाचा सलामीवीर म्हणून खेळत असतो. आयपीएलमधील खराब कामगिरीनंतरही त्याला ऑस्ट्रेलियान दौऱ्यावरील कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत संधी देण्यात आली होती. मात्र, पहिल्या डावात शून्य व दुसऱ्या डावात चार अशा धावसंख्या केल्याने त्याला संघातून डच्चू देण्यात आला. पाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड देखील केली गेली नाही.

कशी राहिली आहे कसोटी कारकीर्द

पृथ्वीने २०१८ साली वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. पहिल्याच सामन्यात त्यांनी दमदार शतक ठोकत, सर्वांचे कौतुक मिळवलेले. पृथ्वीने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीमध्ये ५ कसोटी सामने खेळताना ४२.३७ च्या सरासरीने ३३९ धावा काढल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतके व एका शतकाचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी ‘या’ खेळाडूंना विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा सोडावी लागणार अर्धवट

आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिलेल्या कॉनवे, सोधीची शानदार कामगिरी, न्यूझीलंडल मिळवून दिला विजय

सुर्यकुमारने ताज्या केल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्यानंतरच्या आठवणी; म्हणाला, “तेव्हा मी एकटाच…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---