---Advertisement---

फॉर्ममध्ये परतताच पृथ्वी शॉचा संघ निवडकर्त्यांवर निशाणा; म्हणाला, ‘मी विचारही करत नाही…’

On: शुक्रवार, ऑगस्ट 11, 2023 12:50 PM
Prithvi Shaw
---Advertisement---

गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर असलेला सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ सध्या आपल्या दमदार खेळीमुळे चर्चेत आहे. शॉ याने इंग्लंडमध्ये चालू आसलेल्या वनडेमध्ये क्रिकेट स्पर्धेमध्ये २४४ धावांची खेळी करून खळबळ उडवून दिली. शॉ बुधवारी नॉर्थम्प्टनशायरकडून सॉमरसेटविरुद्ध खेळताना फॉर्ममध्ये परतला आणि त्याने केवळ 153 चेंडूत 244 धावा केल्या. तुफानी द्विशतक झळकावल्यानंतर पृथ्वी शॉने मोठे वक्तव्य केले आहे.

पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ने प्रथमच कौंटी क्रिकेट खेळताना आपल्या स्फोटक खेळीत 28 चौकार आणि 11 षटकार ठोकले. त्याचे या प्रकारामधले हे पहिलेच द्विशतक आहे. पृथ्वी शॉ म्हणाला, “मी अनुभव मिळविण्यासाठी या ठिकाणी खेळत आहे. संघ निवडकर्ते काय विचार करत आहेत याचा मी विचारही करत नाही. मला फक्त येथे चांगला वेळ घालवायचा आहे.”

शॉ पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्हच्या बॅटला आतल्या बाजूने चेंडू लागूनही तुम्ही बाद झाला नसाल, तेव्हा समजून घ्या की आज तुमचा दिवस आहे. आपण कधी कधी खूप भाग्यवान असतो. जेव्हा मी 150 धावा पूर्ण केल्या तेव्हा मला वाटले की आजचा दिवस मोठा डाव खेळण्याचा आहे.”

पृथ्वी शॉची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
पृथ्वी शॉने भारतीय संघाकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै 2021 मध्ये खेळला होता. त्याने आतापर्यंत भारतासाठी 5 कसोटी, 6 वनडे आणि एक टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. शॉने पदार्पणाच्या कसोटीतच शतक झळकावले. त्याच्या पाच कसोटीत 339 धावा आहेत. त्याचबरोबर त्याने 6 वनडेमध्ये 189 धावा केल्या आहेत.

पृथ्वी शॉची आपीयल कारकीर्द
शॉच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 71 सामन्यांमध्ये सुमारे 146 च्या स्ट्राइक रेटने 1694 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 13 अर्धशतके झळकली आहेत. आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या 99 धावा आहे. (prithvi shaw made a big statement after double century)

महत्वाच्या बातम्या- 
विराट कोहली का खेळत नाही T20 क्रिकेट? कर्णधार रोहितने सांगूनच टाकले कारण, वाचाच!
रोहितलाच नाही स्वतःच्या निवडीची गॅरंटी! म्हणाला, “प्रत्येकाला संघर्ष करावा लागेल”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---