---Advertisement---

भारीच ना! पृथ्वीने ‘किंग’ कोहली अन् संघसहकाऱ्यांसोबत वर्कआऊट करतानाचा फोटो केला शेअर, म्हणाला…

On: मंगळवार, ऑगस्ट 24, 2021 6:52 PM
Prithvi-Shaw-Virat-Kohli-Suryakumar-Yadav-Wridhhiman-Saha-Mohammad-Shami
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाने जिममध्ये प्रचंड घाम गाळला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना बुधवारपासून(२५ ऑगस्ट) हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. भारत सध्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. गेल्या आठवड्यात लॉर्ड्सवर भारताने दुसरी कसोटी जिंकली होती, तर पावसामुळे पहिली कसोटी अनिर्णित राहिली होती.

आता हेडिंग्ले कसोटी जवळ आली आहे. भारतीय खेळाडू गेल्या काही दिवसांपासून नेट्स आणि जिम सेशन्समध्ये प्रचंड घाम गाळत आहेत. पृथ्वी शॉने त्याच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम हँडलवर आपल्या संघसहकाऱ्यांसह एक फोटो शेअर केला आहे. ज्याद्वारे त्याने तिसऱ्या कसोटीच्या आधी चाहत्यांना आपली ॲक्टिव्हिटी अपडेट केली आहे.

चाहत्यांना या फोटोमध्ये शॉ, विराट कोहली, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव आणि वृद्धीमान साहा एकत्र दिसत आहे. शॉने या फोटोसह कॅप्शन लिहिले की, “वर्कआउट ऑन गुड डे, वाईट दिवशी कठोर वर्कआउट करा.”

https://www.instagram.com/p/CS65MYOIKcr/

शॉ आणि सूर्यकुमार यांची या इंग्लंड दौऱ्यासाठी जखमी खेळाडूंऐवजी निवड झाली आहे. दरम्यान, पहिल्या दोन कसोटीवेळी हे दोघेही क्वारंटाईनचा अनिवार्य कालावधी पूर्ण करत होते, त्यामुळे ते पहिल्या दोन्ही कसोटींसाठी उपलब्ध नव्हते. मात्र, आता त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला असून ते तिसऱ्या कसोटीसाठी उपबल्ध असणार आहेत. त्यामुळे आता त्यांना तिसऱ्या कसोटीत अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळणार का, हे पाहावे लागेल.

पुजारा-रहाणेपेक्षा सूर्यकुमार यादवला प्राधान्य देईल: इंजिनीअर
माजी भारतीय क्रिकेटपटू फारुख इंजिनीअर यांनी सांगितले की, त्यांनी रहाणे किंवा पुजाराच्या तुलनेत भारतीय कसोटी संघाच्या मधल्या फळीत सूर्यकुमार यादवला प्राधान्य दिले असते. त्यांनी सूर्यकुमारला आक्रमक आणि सामना जिंकणारा खेळाडू म्हणून संबोधले.

स्पोर्ट्सतक बरोबरच्या संभाषणात फारुख इंजिनिअरने सूर्यकुमार यादवबद्दल सांगितले की, त्याला एक विशेष खेळाडू का मानले जात आहे. इंजिनिअर म्हणाला, ‘पहिली गोष्ट, मी सूर्यकुमार यादवचा मोठा चाहता आहे. तो माझ्या मते चांगला खेळाडू आहे. मी त्याला पुजारा किंवा रहाणेपेक्षा आधी प्राधान्य देईन. सूर्यकुमार यादव मॅच विनर आहे. तो आक्रमक खेळाडू आहे. तो तुम्हाला वेगाने १०० धावा बनवून देऊ शकतो, वेगाने ७०-८० धावा बनवून देऊ शकतो. तो एक चांगला फलंदाज, एक चांगला क्षेत्ररक्षक आणि एक चांगला माणूस देखील आहे.’

महत्त्वाच्या बातम्या – 

संघसहकाऱ्याची गोलंदाजी पाहून बाबर आझमही झाला घायाळ; प्रशंसा करत म्हणाला, ‘हाय हाय मजे’

“हार्दिक पंड्या शरीराने खूपच बारीक आहे, त्यामुळे तो नेहमी दुखापतग्रस्त होतो”

अर्जुन तेंडुलकरचा मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न, दिग्गजांकडून गिरवतोय धडे, पाहा फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---