---Advertisement---

मोठी बातमी..! “जास्त वजन आणि शिस्तभंग प्रकरणी” पृथ्वी शॉची मुंबई संघातून हकालपट्टी

---Advertisement---

पृथ्वी शॉ त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत सतत अपयशी ठरत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा आणि कसोटी पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉने सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यानंतर त्याची संघात निवड नक्कीच झाली. पण त्याला प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी मिळाली नाही.

या सततच्या अपयशानंतर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय झाला. मात्र कधी दुखापतीमुळे तर कधी अन्य कारणांमुळे त्याला क्रिकेटपासून दूर राहावे लागले. दरम्यान आता त्याला रणजी ट्राॅफीच्या मुंबई संघातून वगळण्यात आले. फॉर्म ही त्याची समस्या नक्कीच आहे. पण सध्याचा सर्वात मोठा प्रश्न त्याचा फिटनेस आहे. याच कारणामुळे त्याला रणजी संघातून वगळण्यात आले आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मीडिया रिलीझ म्हणजेच एमसीएने पृथ्वी शॉला का वगळण्यात आले याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण आता अनेक वृत्त अहवालांमध्ये त्याच्या फिटनेसमध्ये समस्या असल्याचा दावा करण्यात आला आहे. पृथ्वी शॉने अलीकडेच एका इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटले आहे की. तो ब्रेक घेत आहे. पण सत्य काही वेगळेच आहे.

 

क्रिकबझच्या वृत्तानुसार, मुंबई संघ निवडक आणि संघ व्यवस्थापनाशी संबंधित लोकांच्या मते शॉचे वजन जास्त आहे. तो नेट सराव सत्रांना गांभीर्याने घेत नाही आणि अनियमितपणे हजेरी लावतो असेही आढळून आले आहे. त्याच वेळी, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांसारखे संघातील इतर भारतीय खेळाडू त्यांच्या सराव सत्रांमध्ये नियमित असतात, परंतु पृथ्वी शॉ सतत सराव सत्रे वगळत आहे. तो एका हंगामानंतर दोन हंगाम सोडतो. असा खुलासा झाला आहे. 

41 रणजी सामन्यांचा अनुभव असलेल्या अखिल हेरवाडकरची मुंबई संघात पृथ्वी शॉच्या जागी रणजी ट्रॉफी सामन्यात निवड करण्यात आली आहे. तनुष कोटियनच्या रूपाने सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या संघात आणखी एक बदल दिसून आला. ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या भारत अ संघात त्याची निवड झाल्याने त्याला संघातून मुक्त करण्यात आले आहे. त्याच्या जागी 28 वर्षीय लेफ्ट आर्म स्पिनर कर्श कोठारीला संघात आणण्यात आले आहे.

हेही वाचा-

खान कुटुंबीयांसाठी एका पाठोपाठ एक गूड न्यूज, ‘शतकावीर’नंतर सरफराज बनला पिता
IND VS NZ; दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, स्टार खेळाडू फिट..!
IND vs NZ: संघाला मोठा धक्का! अनुभवी खेळाडू दुसऱ्या कसोटीतून बाहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---