भारताचा युवा प्रतिभाशाली फलंदाज पृथ्वी शॉने आॅक्टोबरमध्ये विंडिज विरुद्ध कसोटीमध्ये शतकी खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण केले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठीही निवड करण्यात आली आहे.
त्यामुळे तो सध्या भारतीय संघाबरोबर आॅस्ट्रेलियामध्ये काही हलके फुलक्या क्षणांचीही मजा घेत आहे. याचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यापैकी भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माबरोबरील त्याचा फोटो त्याने शेअर केला आहे. या फोटोमध्ये रोहित आणि शॉ शेजारी बसले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना शॉने म्हटले आहे की ‘रोहितप्रमाणे चेंडूला शक्य तितके मोठे बघण्याचा सराव करण्याचा प्रयत्न करत आहे.’
Trying to practice seeing the ball
As Big @ImRo45 bhai can….🤣 pic.twitter.com/ulJpgsSPUx— Prithvi Shaw (@PrithviShaw) November 27, 2018
याबरोबरच शॉने विराट कोहली आणि रिषभ पंच बरोबर व्हिडिओ गेम खेळतानाचा फोटोही शेअर केला आहे.
PS4 game on #funtime#with @imVkohli @RishabPant777 pic.twitter.com/Vd9Cepw5T6
— Prithvi Shaw (@PrithviShaw) November 28, 2018
शॉ विंडिज विरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत मालिकावीराचाही मानकरी ठरला होता. त्याने या मालिकेत तीन डावात 237 धावा केल्या होत्या. तसेच या मालिकेनंतर तो देशांतर्गत स्पर्धेत आणि भारत अ संघाकडूनही खेळला आहे. या दोन्ही संघांकडूनही त्याची चांगली कामगिरी झाली आहे.
त्याचबरोबर त्याने भारत अ संघाकडून 16 – 19 नोव्हेंबरदरम्यान न्यूझीलंड विरुद्ध पार पडलेल्या कसोटी सामन्यातही दोन अर्धशतके केली आहेत.
तसेच रोहितने जवळजवळ 10 महिन्यांनतर भारताच्या कसोटी संघात पुनरागमन केले आहे. तो भारताकडून शेवटचा कसोटी सामना जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–किंग्स इलेव्हन पंजाबमध्येही स्थान न मिळालेल्या युवराजला या संघाने दिला सहारा
–बंदी घातेलला स्टिव स्मिथ खेळणार चौथ्याच संघाकडून
–पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, टीम इंडियाने घेतला हा मोठा निर्णय
–मिताली राज- हरमनप्रीत प्रकरण काही थांबेना, पुन्हा नवा खुलासा जगासमोर