24 जानेवारीपासून भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र हा दौरा सुरु होण्याआधीच भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने तो वनडे आणि टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्याजागी युवा क्रिकेटपटू पृथ्वी शाॅला वनडेत संधी देण्यात आली आहे.
शिखरला रविवारी(19 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा वनडे सामना खेळताना डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्याला या सामन्यात ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करत असताना 5 व्या षटकात ऍरॉन फिंचने कव्हरच्या क्षेत्रात मारलेला चेंडू आडवण्याच्या नादात दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याने या सामन्यात फलंदाजीही केली नाही.
पृथ्वी शाॅची अ दर्जाच्या सामन्यांतील कामगिरी-
व्यावसायिक क्रिकेटमध्ये शाॅ आजपर्यंत २ कसोटी सामने, २० प्रथम श्रेणी सामने, २८ अ दर्जाचे सामने आणि देशांतर्गत २८ टी२० सामने खेळला आहे. तसेच आयपीएलचेही २५ सामने खेळला आहे.
२० वर्ष आणि ७४ दिवस वय असेलेल्या शाॅने आजपर्यंत २८ अ दर्जाच्या सामन्यात ४४.३९च्या सरासरीने १२४३ धावा केल्या आहेत. यात ४ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याचा स्टाईक रेटही तब्बल ११८.४९चा आहे. २८ सामन्यांत त्याने २९ षटकार आणि १७२ चौकारांची बरसात केली आहे.
१५० ही त्याची अ दर्जाच्या सामन्यांतील त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
केवळ २ कसोटी सामने खेळलेल्या शाॅने या दोन सामन्यात ११८.५०च्या सरासरीने २३७ धावा केल्या आहेत. अनेक क्रिकेट चाहत्यांना तो विश्वचषक २०१९मध्ये खेळेल असे वाटत होते. परंतु त्याला तेव्हा संधी देण्यात आली नाही. तसेच दुखापतीमुळे तो ऑक्टोबर २०१८पासून टीम इंडियाच्या बाहेर आहे.
संधी मिळेल का?
३ वनडे सामन्यांच्या या मालिकेत भारताकडे रोहित शर्मा आणि मनीष पांडे हे स्पेशलिस्ट सलामीवीर आहेत. परंतु या मालिकेत केएल राहुलला जर तीनही सलामीवीर म्हणून संधी दिली तर वनडे पदार्पणासाठी शाॅला वाट पहावी लागेल. परंतु जर केएल राहुला रिषभ पंतच्या जागी संधी दिली तर रोहित शर्मासह पृथ्वी शाॅच्या रुपाने दोन मुंबईकर अनेक वर्षांनी वनडेत सलामीला आलेले दिसतील.
वनडेत धावांचा पाठलाग करताना कोण भारी? सचिन की विराट?
वाचा- 👉https://t.co/nxT1zoAO5i👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @sachin_rt @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020
रॉस टेलर म्हणतो, टीम इंडिया अव्वल क्रमांकाचा संघ, पण…
वाचा👉https://t.co/QTZrFFBnFY👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @RossLTaylor— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020
दक्षिण आफ्रिकेला मिळाला नवीन कर्णधार; डूप्लेसिस ऐवजी हा खेळाडू करणार नेतृत्व
वाचा👉https://t.co/BvGtzI7Egt👈#म #मराठी #Cricket #SAvENG @QuinnyDeKock69— Maha Sports (@Maha_Sports) January 22, 2020