---Advertisement---

पृथ्वी शॉच्या कथित गर्लफ्रेंडचा ‘बिल्लो रानी’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हायरल व्हिडिओ

On: गुरूवार, मे 20, 2021 8:22 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉची कथित गर्लफ्रेंड प्राची सिंग सोशल मीडियात फार सक्रिय असते. प्राचीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर आपल्या डान्सचा व्हिडिओ शेयर केला आहे. प्राचीने तिचा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून,या व्हिडिओमध्ये ती गोल या चित्रपटाच्या ‘बिल्लो रानी’ या गाण्यावर शानदार डान्स करत आहे.

प्राचीने आपल्या डान्स द्वारे सर्वांची वाहवा मिळवली आहे. तिने डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘बॉली-मूड’. प्राचीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्याप्रमाणात वायरल होत असून नेटकरी देखील व्हिडिओला पसंत करत आहेत. यापूर्वी प्राचीने अक्षय कुमारच्या चांदणी चौक टू चायना या चित्रपटातील ,”तेरे नैना मेरे नैना,” या गाण्यावर शानदार डान्स केला होता. प्राचीचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल झाला असून, नेटकऱ्यांनी त्याला देखील पसंत केले होते.

https://www.instagram.com/p/CPDs3iHnppf/?utm_source=ig_web_copy_link

पृथ्वी व प्राची मधील नात्याची अजून तरी दोघांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर ते कायमच वेगवेगळ्या कमेंट्स करत असतात. दोघांमधील या संभाषणाद्वारेच चाहत्यांमध्ये त्यांच्या दोघांच्या नात्याची चर्चा होत असते.

दरम्यान प्राचीचा विचार केला असता, ती अनेक टीव्ही सिरीयल मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. तिची सर्वात प्रसिद्ध सिरीयल कलर्स वाहिनीवरील उडान ठरलेली आहे.अभिनयासोबतच प्राची एक उत्कृष्ट डांसर असून सोशल मीडियाद्वारे ती अनेक वेळा आपले डान्स व्हिडिओ शेअर करत असते. तर दुसरीकडे पृथ्वी देखील आपल्या करिअरमध्ये एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत असून, भारतीय संघात त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पृथ्वीकडून सर्व क्रिकेट प्रेमींना खूप अपेक्षा असून, आगामी काळात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यात त्याला भारतीय संघासाठी सलामीला खेळण्याची संधी मिळू शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! भारताच्या अव्वल गोलंदाजांच्या वडिलांचे निधन, यकृताच्या कर्करोगाने होते त्रस्त

आधी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत अडवला चेंडू, नंतर स्वत:च फेकला सीमारेषेबाहेर! पाहा विनोदी व्हिडिओ

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जिंकणे या खेळाडूविना आहे अशक्य, पाहा काय सांगतायेत आकडे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---