नुकताच भारताचा बांगलादेश दौरा पार पडला. हा दौरा भारतासाठी आंबट गोड ठरला. या दौऱ्यावर भारताला एकदिवसीय आणि टी20 मालिकेत पराभव स्वीकारावा लागला तर कसोटीमध्ये भारताने बांगलादेशला व्हाईटवॉश दिला. त्यानंतर श्रीलंका संघ आता भारताचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर भारत आणि श्रीलंका संघात 3 टी20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारताच्या टी20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या याच्याकडे सोपवण्यात आले असून एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा असणार आहे. बऱ्याच नव्या आणि जुन्या खेळाडूंच्या नावांसोबत संघ जाहीर झाला. मात्र, या संघातून पृथ्वी शॉ याला डच्चू मिळाला आहे आणि रिषभ पंत हा देखील संघाबाहेर झाला आहे.
पृथ्वी शॉ (Prithwi Shaw) याने जुलै 2021मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध टी20 सामना खेळला, हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. या युवा सलामीवीराने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगले प्रदर्शन केले आहे. एवढेच नव्हे तर त्याने आयपीएल 2022मध्ये देखील चांगले प्रदर्शन केले होते. मात्र, त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली नाही. तसेच श्रीलंके विरुद्ध भारतीय संघाच्या निवडीनंतर शॉने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी शेअर केली, ज्यातून तो भावनिक झाल्याचा प्रत्यय येत आहे.
पृथ्वी शॉ याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन लागोपाठ दोन स्टोरी शेअर केल्या. त्यातील एका स्टोरीमध्ये एक शायरी आहे, ज्यात म्हटलय की, “किसीने मुफ्त में पा लिया वह शख्स, जो मुझे हर किमत पर चाहिये था.” याचा अर्थ असा काढला जाऊ शकतो की भारतीय संघात अशा खेळाडूला संधी मिळाली ज्याला त्याच्या लायक नव्हता आणि ज्याला संघात जागा मिळायला पाहिजे होती, तो त्या संधीपासून तो वंचित राहिला. पृथ्वी शॉ याने शेअर केलेल्या या स्टोरीवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
श्रीलंका संघ जानेेवीरीच्या सुरुवातीला भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये पहिला टी20 सामना 3 जानेवारीला खेळवला जाणार आहे. टी20 मालिका संपल्यानंतर 3 एकदिवसीय सामन्यांचे आयोजन होणार आहे. ही एकदिवसीय मालिका भारतासाठी विश्वचषकाची तयारी असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
निवड समितीच्या बैठकीत भुवीच्या नावाची चर्चाही नाही? युवा सेनेलाच मिळणार आता संधी
तेजतर्रार अर्शदीप पहिल्याच वर्षी आयसीसी पुरस्कारासाठी नामांकित; हे खेळाडू देणार टक्कर