पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये मनीष नरवलाने राैप्य पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केला आहे. त्याच सोबत प्रीती पालने कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. तिने महिलांच्या 100 मीटर टी35 प्रकारातील शर्यतीत पदक जिंकले आहे. तर मनिष नरवालने 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये राैप्यपदक जिंकला आहे. आजच्या दिवशी (30 ऑगस्ट) रोजी भारताने जिंकलेले हे चाैथे पदक आहे. प्रीतीने इतिहासही रचला आहे. कारण ती पॅरालिम्पिक गेम्सच्या ट्रॅक इव्हेंटमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
टी35 प्रकारातील महिलांच्या 100 मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत भारताच्या प्रीती पालने 14.21 सेकंदात शर्यत पूर्ण केली. आणि तिसरे स्थान पटकावले. चीनच्या धावपटूंनी प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला. चीनच्या जिया (13.35 सेकंद) आणि गुओने (13.74) सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्यपदक जिंकले. तर नेबमाज मनीष नरवालने चमकदार कामगिरी करत यंदाच्या पॅरालिम्पिकमध्ये राैप्य पदकावर निशाणा साधला आहे. त्याने टोकियोच्या पॅरालिम्पिकमध्ये देखील सुवर्णपदक जिंकले होते.
प्रीती पालने यावर्षी कोबे येथे झालेल्या वर्ल्ड पॅराॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये कांस्य पदक जिंकून थेट पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले होते. गतवर्षी पॅराआशियाई क्रीडा स्पर्धेत प्रीतीला कोणतेही पदक जिंकण्यापासून वंचित राहावे लागले असले. तरी आता तिने कांस्यपदक जिंकून 140 कोटी भारतीयांना आनंद दिला आहे.
काल (29 ऑगस्ट) पॅरालिम्पिकमध्ये भारताने चांगली सुरुवात केली होती. परंतु पदकतालिकेत भारताचे पहिले, दुसरे आणि आता तिसरे पदक आज (30 ऑगस्ट) रोजी आले. मनीष नरवलच्या आधी प्रिती पाल, अवनी लेखरा, मोना अग्रवाल यांनी अनुक्रमे कांस्य, सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले आहे.
GOLD for Avani Lekhara.
SILVER for Manish Narwal.
BRONZE for Mona Agarwal.
BRONZE for Preethi Pal.– 4 Medals in a single day for India at the Paris Paralympics. 🇮🇳pic.twitter.com/BwCmkOMNBB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 30, 2024
अवनी लेखरा हिने टोकियो पॅरालिम्पिकच्या महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले आहे. दुसरीकडे, मोना अग्रवालने कांस्यपदक जिंकले आहे. आता प्रीती पालने कांस्यपदक जिंकून पदकतालिकेत भारताला फायदा करून दिला आहे. भारत आता 1 सुवर्ण आणि 2 कांस्यांसह पदकतालिकेत 11व्या स्थानावर आला आहे.
हेही वाचा-
फलंदाजानं लगावला चौकार अन् सूर्यानं मागितली माफी, कारण काय?
“जो रुटला दोन जन्म घ्यावे लागतील, विराटचा…”, चाहत्यांनी घेतला मायकल वॉनचा क्लास
RCB साठी आनंदाची बातमी! संघातील ‘या’ स्टार खेळाडूने ठोकले झंझावाती शतक