शुक्रवारी(२ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएल२०२० च्या १४ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाला ७ धावांनी पराभूत केले. हैदराबादकडून १९ वर्षीय प्रियम गर्गने शानदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात २६ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या. या खेळीत त्याने ६ चौकार आणि १ षटकार मारला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
गर्ग हैदराबादने ६९ धावांवर तिसरी विकेट गमावली असताना फलंदाजीला आला होता. तो फलंदाजीला आल्यानंतर लगेचच हैदराबादने चौथ्या विकेटच्या रुपात केन विलियम्सनला गमावले. त्यामुळे गर्गवर हैदराबादच्या डावाला सावरण्याची जबाबदारी आली होती. त्यानेही ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावली. त्याने अभिषेक शर्माला साथीला घेत पाचव्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी रचली.
गर्गने सुरुवातीला सावध सुरुवात केली होती. पण नंतर त्याने चेन्नईचा अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करनच्या गोलंदाजीवर आक्रमण केले. करनने टाकलेल्या १७ व्या षटकात त्याने २१ धावा चोपल्या होत्या. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे आणि अभिषेकबरोबर केलेल्या भागीदारीमुळे हैदराबादला प्रथम फलंदाजी करताना सन्मानजनक १६४ धावा करता आल्या.
या सामन्यादरम्यान दबावातही गर्गने चेन्नईच्या अनुभवी खेळाडूंसमोर दाखवलेल्या धैर्यामुळे त्याचे कौतुकही मोठ्या प्रमाणात झाले.
गर्ग हा यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात खेळलेल्या भारतीय संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण अंतिम सामन्यात बांगलादेशविरुद्ध भारताला पराभवाचा धक्का बसला.
https://twitter.com/chaitu_20/status/1312063989950504960
https://twitter.com/TrollSRHHaters_/status/1312270200641781760
What a shot men….
Sweep shot against seamers 👏👏👏😍 🙏#PriyamGarg
In this era only few who can play this shots 😍❤Indian cricket future in safe hands 👍 pic.twitter.com/h9cKnZ19Fe
— {NITISH} (@gnitishkohli) October 2, 2020
https://twitter.com/overDwicket/status/1312063572810244096
शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नईला १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना निर्धारित २० षटकात ५ बाद १५७ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. तर धोनीने नाबाद ४७ धावा केल्या. तसेच फाफ डु प्लेसिसने २२ धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणालाही खास काही करता आले नाही.