देशांतर्गत टी२० सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी उत्तर प्रदेशच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या वेळी अनुभवी फलंदाज सुरेश रैनाऐवजी युवा फलंदाज प्रियम गर्गला उत्तर प्रदेश संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जवळपास २ वर्षांनंतर सुरेश रैना क्रिकेट मैदानात पुनरागमन करणार आहे. अशा वेळी म्हटले जात होते की, रैनाच उत्तर प्रदेश संघाचा कर्णधार असेल.
युवा प्रियम गर्गने कर्णधार असताना २०२० साली झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताला अंतिम सामन्यापर्यंत धडक मारून दिली होती. अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताचा ३ विकेटने पराभव केला होता. गर्ग मागील रणजी ट्रॉफी स्पर्धेत देखील उत्तर प्रदेश संघाचा कर्णधार होता.
उत्तर प्रदेश संघाचे मुख्य अधिकारी दीपक शर्मा यांनी गर्गला कर्णधार तसेच अनुभवी फिरकी गोलंदाज कर्ण शर्माला उपकर्णधार निवडले गेल्याचे स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत रैनाने म्हटले होते की, आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जरी घेतली असली, तरी उत्तर प्रदेशला आणखी एक स्पर्धा जिंकून देण्यासाठी सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धा खेळणार आहोत. यानंतर म्हटले जात होते की रैना उत्तर प्रदेश संघाचा कर्णधार असेल. मात्र, निवड समितीने युवा प्रियम गर्गवर जबाबदारी सोपवली आहे.
ही सर्व प्रक्रिया घडत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अजूनही सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेची अधिकृत घोषणा केलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडला दणका! श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून २ मोठे खेळाडू बाहेर
हम खुद के फेवरेट है.! ऐतिहासिक खेळीनंतर बुमराहचं स्वतःसाठी खास ट्विट
कसं काय, हार्दिक भाऊ? पंड्याचा मराठी बोलतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल
ट्रेंडिंग लेख-
…तर बाबरने विराटकडून घ्यावे धडे; माजी दिग्गजाने मांडले मत
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ‘हे’ ३ गोलंदाज लढवणार भारताची खिंड; स्पिनरचाही समावेश
भारतीय संघाची अष्टपैलूची चिंता कोण मिटवणार? ‘या’ ५ खेळाडूंचे आहेत पर्याय