आयपीएल 2025 स्पर्धेतील आज 8 एप्रिल रोजी 22वा सामना पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये खेळला जात आहे. त्यादरम्यान प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जचा सलामीवीर युवा खेळाडू प्रियांश आर्यने त्याच्या शतकी खेळीमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध सामन्यात तो आज गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला. त्याने चौकार-षटकारांचा जोरदार पाऊस पाडला. प्रियांशने खलील अहमदच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला, यानंतर पहिल्याच षटकात 5 व्या चेंडूवरही त्याने षटकार ठोकला. यानंतर फक्त 19 चेंडूत त्याने हंगामातील पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. यानंतर त्याने अवघ्या 39 चेंडूत शानदार शतक पूर्ण केले.
प्रियांश आर्यने पंजाबसाठी फलंदाजी करताना फक्त 42 चेंडूत 252 च्या स्ट्राईक रेटने 7 चौकार आणि 9 षटकारांसह 103 धावांची दमदार खेळी केली. पंजाब किंग्स संघाच्या एका पाठोपाठ एक विकेट्स पडत असताना संघाच्या धावसंख्येसाठी एकट्याने भूमिका निभावली. 8 षटकांमध्ये अर्धा पंजाब संघ माघारी परतला होता. पण त्याने संघासाठी जोरदार कामगिरी करून चेन्नईला जिंकण्यासाठी 220 धावांचं आव्हान दिलं आहे.
प्रियांश आर्यने दिल्ली प्रिमीयर लीगमध्ये त्याच्या चांगल्या कामगिरीने लक्ष वेधून घेतलं होतं. दिल्ली प्रीमियर लीग (DPL 2024) मधून आलेला युवा फलंदाज प्रियांश आर्यला चाहते भविष्यातील सुपरस्टार म्हणत आहेत. जेव्हा त्याचे नाव आयपीएल लिलावात आले तेव्हा, या लीगच्या फ्रँचायझींनी त्याच्यावर मोठी बोली लावली. या खेळाडूला खरेदी करण्यासाठी दिल्ली, मुंबई, पंजाब आणि बेंगळुरूमध्ये चुरस झाली. पण पंजाब किंग्सने बाजी मारत त्याला संघात सामील त्यांच्या संघात घेतले.





टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा