आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 अवघ्या काही दिवसांवर आला आहे. 16 ऑक्टोबर रोजी विश्वचषक सुरू होईल. भारताला त्यांचा पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत खेळायचा आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत एकूण 5.6 मिलियन अमेरिकन डॉलर्सची बक्षिसे वाटली जाणार आहेत. मात्र, ही बक्षिसाची रक्कम फुटबॉल विश्वचषकाच्या रकमेच्या अगदीच नगण्य आहे.
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, विजेता संघ 1.6 मिलियन डॉलर (जवळपास 13 कोटी रुपये) इतकी रक्कम जिंकेल. उपविजेता संघ 0.8 मिलियन डॉलरचा (जवळपास 6.5 कोटी रुपये) मानकरी होईल. तर, उपांत्य सामन्यात पराभूत होणारे संघ 0.4 मिलियन डॉलर (जवळपास 3.26 कोटी रुपये) इतकी रक्कम जिंकेल. सुपर 12 फेरीत प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला 40 हजार डॉलर (जवळपास 33.62 लाख रुपये) रुपयांची रक्कम मिळेल. सुपर 12 फेरीतून मधून बाहेर होणारा प्रत्येक संघ 70 हजार डॉलर (जवळपास 57.09 लाख रुपये) जिंकणार आहे. पहिल्या फेरीत प्रत्येक सामना जिंकणारा संघ 40 हजार डॉलर (जवळपास 33.62 लाख रुपये) आपल्या नावे करेल. अखेरीस पहिल्या फेरीतून बाहेर होणारा प्रत्येक संघ 40 हजार डॉलर (जवळपास 33.62 लाख रुपये) घेऊन जाईल.
त्यानंतर याचवर्षी 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये फुटबॉल विश्वचषकाचा बिगुल वाजला जाईल. 20 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबरला होणार आहे. जगातील सर्वात मोठा विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फुटबॉल विश्वचषकात तब्बल 440 मिलियन अमेरिकन डॉलर्सची बक्षिसे वाटली जातील. भारतीय रुपयात ही रक्कम चक्क 3592 कोटी इतकी होत आहे. ही एकूण रक्कम टी20 विश्वचषकातील बक्षीस रकमेच्या आकड्यापेक्षा कितीतरी अवाढव्य आहे.
फिफा विश्वचषक विजेत्या संघाला 367 कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळेल. तर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला जवळपास 261 कोटी रुपये मिळणार आहेत. विशेष म्हणजे टी20 विश्वचषक विजेत्या संघाला आयपीएल विजेत्या संघापेक्षाही कमी रक्कम मिळेल. यावर्षी आयपीएल जिंकणाऱ्या गुजरात टायटन्स संघाला 20 कोटी रुपये देण्यात आले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2022: जेमीमाह रोड्रिगेझची ‘फिफ्टी’, भारताचे श्रीलंकेसमोर 151 धावांचे लक्ष्य
स्टेडियमबाहेर जमलेल्या गर्दीला पंतने केले खुश! दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल






