इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२१ मधील महत्त्वाचा आणि अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. या सामन्यात सीएसकेने २७ धावांनी विजय मिळवत चौथ्यांदा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर केली. या विजयाचा शिल्पकार फाफ डू प्लेसिस ठरला. फाफला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. सीएसकेला या विजयानंतर मिळालेल्या प्राईझ मनीने म्हणजेच बक्षिसाच्या रकमेने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
सामन्याविषयी थोडक्यात-
या सामन्यात नाणेफेक जिंकून केकेआरने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच सीएसकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने निर्धारित २० षटकात ३ विकेट्स गमावत १९२ धावा केल्या होत्या. सीएसकेने दिलेल्या १९३ धावांचे आव्हान पूर्ण करण्यात केकेआर संघ अपयशी ठरला. त्यांनी निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत केवळ १६५ धावा केल्या होत्या. अशाप्रकारे त्यांना पराभव स्वीकारत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
बक्षिसाची रक्कम
विशेष म्हणजे आयपीएल २०२१ चे विजेतेपद पटकावल्यानंतर सीएसकेला तब्बल २० कोटी रुपये बक्षीस रक्कम देण्यात आली. ही रक्कम टी२० विश्वचषकाच्या बक्षीस रकमेपेक्षा खूपच जास्त आहे. टी२० विश्वचषकासाठी विजेत्या संघाची बक्षीस रक्कम ही १२ कोटी रुपये इतकी आहे. या दोन्ही बक्षीस रकमेतील फरक हा तब्बल ८ कोटी रुपये इतका आहे. ही बक्षीस रक्कम वाचून प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Prize money for the champion team:
IPL 2021: INR 20 crores (USD 2.6 Million)
World T20: INR 12 crores (USD 1.6 Million)#IPL2021 #WT20— Bharath Seervi (@SeerviBharath) October 15, 2021
टी२० विश्वचषक
टी२० विश्वचषकात जगभरातील १६ संघ उतरणार आहेत. यातील सामने १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. यामधील भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. याव्यतिरिक्त या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी दुबईत खेळला जाईल. स्पर्धेच्या ७ व्या पर्वाचे सामने ओमान आणि युएईमध्ये खेळले जातील. सुरुवातीला या स्पर्धेचे आयोजन भारतात होणार होते. मात्र, कोरोना व्हायरसमुळे या स्पर्धेचे आयोजन युएईत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
हेही वाचा-
-चेन्नईने जिंकले चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद! पाहा आजपर्यंतचे विजेते संघ
-भारीच ना! आयपीएल २०२१ला मिळाला नवा ‘पर्पल कॅप’ विजेता; ‘हे’ आहेत सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ गोलंदाज
-राडाच ना! आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पटकावणारे विस्फोटक फलंदाज; ऋतुराज ठरला चेन्नईचा तिसरा खेळाडू
-आमचा नाद करायचा न्हाय! आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकणारे गोलंदाज; ‘या’ भारतीयाने पटकावल्यात दोनदा




