---Advertisement---

प्रो-कबड्डी लिलावात महाराष्ट्राचे हे खेळाडू झाले मालामाल

On: गुरूवार, मे 31, 2018 6:35 PM
---Advertisement---

मुंबई | बुधवारी प्रो-कबड्डी लिलावाला सुरुवात झालेल्या आज हा लिलाव पार पडला. महाराष्ट्राच्या ४२ पैकी २० खेळाडूंना या लिलावात विविध संघांनी कबड्डीच्या या महाकुंभमेळ्यासाठी संधी दिली. तर ६ खेळाडूंना लिलावापुर्वीच संघात कायम करण्यात आले होते.

त्यात रिशांक देवडिगाला तब्बल १ कोटी ११ लाख रुपये मिळाले. तो महाराष्ट्राचा सर्वात महागडा खेळाडू ठरला शिवाय या हंगामातील ५वा सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर आनंद तोमर या खेळाडूला महाराष्ट्रीयन खेळाडूंमध्ये सर्वात कमी म्हणजे ५ लाख रुपयांची बोली लागली.

लिलावात रिशांक सोडून कोणताही खेळाडू ५० लाखांच्या पुढे जाऊ शकला नाही. रिशांक पाठोपाठ विशाल माने ४५ लाख, श्रीकांत जाधव ३७ लाख, सिद्धार्थ देसाई ३६.४ लाख,  काशीलिंग अडके ३२ लाख आणि ऋतुराज कोरवी – ३०.४ लाख या खेळाडूंना ३० लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळाली.

https://twitter.com/SherryPaaji/status/1002172700117426176

महाराष्ट्रातील खेळाडूंवर लागल्या बोली
१) रिशांक देवाडीगा – १.११ कोटी (युपी योद्धा)
२) श्रीकांत जाधव – ३७ लाख (युपी योद्धा)
३) काशीलिंग अडके – ३२ लाख (बंगळुरू बूल्स)
४) निलेश साळुंखे – रिटेन (तेलुगू टायटन्स)
५) गिरीश इरणाक – रिटेन (पुणेरी पलटण)
६) मयूर शिवतारकर – रिटेन (हरियाणा स्टीलरस)
७) महेंद्र राजपूत – रिटेन (गुजरात)
८) तुषार भोईर – रिटेन (दबंग दिल्ली)
९) जी बी मोरे – रिटेन (पुणेरी पलटण)
१०) अक्रम शेख – ६.६० लाख (युपी योद्धा)
११) विशाल माने – ४५ लाख (दबंग दिल्ली)
१२) विराज लांडगे – २५ लाख (दबंग दिल्ली)
१३) सचिन शिंगाडे – २० लाख (हरियाणा)
१४) तुषार पाटील – २० लाख (पाटणा)
१५) महेश मगदूम – ८ लाख (बंगळुरू बुल्स)
१६) बाजीराव होडगे – १४.६ लाख (जयपूर)
१७) आदिनाथ गवळी – ८ लाख (यु मुंबा)
१८) विकास काळे – २७.४ लाख (पाटणा)
१९) ऋतुराज कोरवी – ३०.४ लाख (गुजरात)
२०) संकेत चव्हाण – ८ लाख (तेलगू)
२१) शुभम पालकर – ८ लाख (गुजरात)
२२) सिद्धार्थ देसाई – ३६.४ लाख (यु मुंबा)
२३) सुनील सिद्धगवळी – ८ लाख (जयपूर)
२४) अक्षय जाधव – ८ लाख (पुणेरी पलटण)
२५) आनंद पाटील – ८ लाख (जयपूर)
२६) आनंद तोमर – ५ लाख (हरियाणा)

वाचा प्रो-कबड्डी २०१८च्या खास बातम्या- 

आईने केलेली प्रार्थना कामी आली- रिशांक देवडिगा

-संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावातील सकाळच्या सत्रातील सर्व बोली

-४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख

-महाराष्ट्राच्या विराज लांडगेला प्रो-कबड्डी लिलावात दुसऱ्या दिवशी पहिली बोली

-संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती

-हा खेळाडू ठरला प्रो-कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

-प्रो-कबड्डीत 1 कोटी बोली लागलेला रिशांक देवडिगा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू

आणि पुणेरी पलटणने लावली या खेळाडूवर तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांची बोली

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment