---Advertisement---

प्रो-कबड्डीच्या ६व्या हंगामाचा उद्घाटनाचा सामना रंगणार या दोन संघात

---Advertisement---

आजपासून प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमाला सुरुवात होत आहे. या मोसमातील पहिला सामना तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स संघात होणार आहे. प्रो कबड्डीच्या या सहाव्या मोसमाची सुरुवात चेन्नई लेगपासून होणार आहे.

त्यामुळे घरच्या प्रेक्षकांसमोर चांगला खेळ करत विजय मिळवण्याचा तमिळ संघाचा प्रयत्न असेल तर गतविजेता पटना पायरेट्सही चांगली लढत देत विजयाने मोसमाची सुरुवात करण्यासाठी आतुर असेल.

या खेळाडूंकडे असेल लक्ष:

तमिळ थलावाजच्या संघात कर्णधार अजय ठाकूर, मनजीत चिल्लर आणि जसवीर सिंग असे अनुभवी खेळाडू आहेत. तसेच सुकेश हेगडे आणि सुरजीत सिंग हे देखील तमिळच्या चढाईच्या फळीला मजबुत करतील.

तसेच बचाव फळीत अमित हुडाला युवा खेळाडू दर्शन जे, सी अरुण यांची साथ मिळेल. या दोघांनीही पाचव्या मोसमात प्रभावीत केले होते. त्याचबरोबर 5 व्या मोसमात पदार्पण करताना अष्टपैलू डी प्रदापनेही चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे या मोसमातही त्याच्यावर लक्ष असेल.

पटना पायरेट्सच्या संघात पाचवे मोसम गाजवलेला त्यांच्या यावर्षीचा कर्णधार परदीप नरवालच्या कामगिकडे सर्वच लक्ष ठऊन आहेत. याबरोबरच पटना संघाला मोनू गोयतची कमी भासेल. पण त्यांच्याकडे दिपक नरवाल आणि सुरेंदर सिंग हे चढाईमध्ये परदीपला साथ देतील.

तसेच मनिष, जयदीप, जवाहर डागर आणि विजय हे बचाव फळी सांंभाळतील. तसेच त्यांना कुलदीप सिंगचीही साथ मिळेल.

त्याचबरोबर मनजीत चिल्लरचा बचाव आणि परदीप नरवालची चढाई यांच्यातील लढत बघणे रंगतदार ठरणार आहे. चिल्लर हा प्रो कबड्डी इतिहासात सर्वाधिक टॅकल पॉइंट असणारा बचावपटू आहे तर परदीप हा सर्वाधिक रेड पॉइंट्स मिळवणारा चढाईपटू आहे.

आमने-सामने:

तमिळ थलायवाज आणि पटना पायरेट्स हे दोन संघ आत्तापर्यंत 3 वेळा आमने सामने आले आहेत. यातील पटना पायरेट्सने 2 आणि तमिळ थलायवाजने 1 वेळा सामन्यात विजय मिळवले आहेत.

तसेच या दोन संघात शेवटच्या झालेल्या सामन्यात तमिळ थलायवाजने विजय मिळवला आहे.

प्रो कबड्डी- तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स सामन्याबद्दल सर्वकाही…

तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स यांच्यात कधी होणार सामना?

तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स यांच्यातील सामना 7 आॅक्टोबर 2018 ला होणार आहे.

कोठे होईल तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स यांच्यातील सामना?

तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स यांच्यातील सामना जवाहरलाल नेहरु स्टेडीयम, चेन्नई येथे होणार आहे.

किती वाजता सुरु होईल तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स यांच्यातील सामना?

भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8.00 वाजता तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स यांच्यातील सामन्याला सुरुवात होईल. 

तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स यांच्यातील सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स यांच्यातील सामना पाहता येणार आहे.

तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स यांच्यातील सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?

hotstar.com या वेबसाईटवर तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स यांच्यातील सामना ऑनलाइन पाहता येईल.

यातून निवडला जाईल 7 जणांचा संघ-

पटना पायरेट्स- परदीप नरवाल, दीपक नरवाल, विकास काळे, कुलदीप सिंग, मनजीत, तुषार पाटील, सुरेंद्र सिंग, ताई दिओक ईओम, ह्यूनिल पार्क, जेई मीन ली, विकास जगलान, विजय कुमार, रविंद्र कुमार, जयदीप, जवाहर डागर, मनिष कुमार, परविन बिरवाल, अरविंद कुमार, विजय, मनिष.

तमिळ थलायवाज- अजय ठाकूर, सुकेश हेगडे, सुरजीत सिंग, दर्शन जे, मनजीत चिल्लर, जसविर सिंग, के जयासिलन, अतुल एमएस, सुनील, चॅन सिक पार्क, अनिल शर्मा, अभिनंदन चांडेल, डी गोपू, विमल राज, जेई मीन ली, अमित हुडा, सी अरुण, डी प्रदाप, रजनीश, अनिल कुमार, आनंद.

महत्वाच्या बातम्या-

Abhinandan Chandel Ajay Thakur Amit Hooda Anand Anil Kumar Anil Sharma Arvind Kumar Atul MS C Arun Chan Sik Park D Gopu D Pradap Darshan J Deepak Narwal Hyunil Park Jae Min Lee Jaideep Jasvir Singh Jawahar Dagar K Jayasselan Kuldeep Singh Manish Manish Kumar Manjeet Manjeet Chhillar Pardeep Narwal Parveen Birwal Pro Kabaddi 2018 Rajnish Ravinder Kumar SUKESH HEGDE Sunil Surender Singh surjeet singh Tae Deok Eom Tamil Thalaivas vs Patna Pirates Tushar Patil Vijay Vijay Kumar Vikas Jaglan Vikas Kale Vimal Raj अजय ठाकूर अतुल एमएस अनिल कुमार अनिल शर्मा अभिनंदन चांडेल अमित हुडा अरविंद कुमार आनंद कुलदीप सिंग के जयासिलन चॅन सिक पार्क जयदीप जवाहर डागर जसविर सिंग जेई मीन ली डी गोपू डी प्रदाप तमिळ थलायवाज विरुद्ध पटना पायरेट्स ताई दिओक ईओम तुषार पाटील दर्शन जे दीपक नरवाल परदीप नरवाल परविन बिरवाल प्रो कबड्डी २०१८ मनजीत मनजीत चिल्लर मनिष कुमार मनिष. रजनीश रविंद्र कुमार विकास काळे विकास जगलान विजय विजय कुमार विमल राज सी. अरुण सुकेश हेगडे सुनील सुरजीत सिंग सुरेंद्र सिंग ह्यूनिल पार्क

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment