पुणे।प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात आज(23 आॅक्टोबर) यू मुम्बा विरुद्ध तेलगू टायटन्स संघात सामना सुरु आहे. या सामन्यात तेलगू टायटन्सचा कर्णधार राहुल चौधरीने खास विक्रम केला आहे.
त्याने आज प्रो कबड्डीमध्ये 700 रेड पॉइंट्स टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो पहिलाच कबड्डीपटू ठरला आहे. हा टप्पा त्याने प्रो कबड्डीतील 84 व्या सामन्यात पुर्ण केला आहे.
त्याचबरोबर प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक गुण घेण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. तो प्रो कबड्डीमध्ये 700 पेक्षा अधिक गुण घेणारा पहिला आणि एकमेव कबड्डीपटू आहे.
या सामन्यात यू मुम्बा पहिल्या सत्रात 17-12 अशा फरकाने आघाडीवर होती.
प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक रेड पॉइंट्स घेणारे कबड्डीपटू-
700* – राहुल चौधरी
671 – परदीप नरवाल
597 – अजय ठाकूर
525 – दीपक हुडा
517 – काशिलिंग अडके
महत्त्वाच्या बातम्या:
–दुसऱ्या वनडेतही कोहली ठरणार किंग, आरामात करणार हे ३ विक्रम आपल्या नावावर
–वयाच्या १५ वर्षी सचिनने जी ड्रेसिंगरुम शेअर केली तिथे ३० वर्षांनी करणार ही गोष्ट