जगातील सर्वात मोठी कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी स्पर्धेचा दहावा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव सोमवारी (9 ऑक्टोबर) पार पडला. या लिलावात पहिलेच नाव इराणचा युवा अष्टपैलू मोहम्मद रेझा शादलू याचे आले. त्यावर सर्वच संघांनी बोली लावली. अखेर पुणेरी पलटणने त्याला आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले. प्रो कबड्डी इतिहासातील सर्वात मोठी बोली ठरली.
ℝ𝔼ℂ𝕆ℝ𝔻 𝔸𝕃𝔼ℝ𝕋 🚨
Ab Pune chain ki saans lenge kyunki aa gaye hai Chiyaneh 🤩An all-time #PKLPlayerAuction record as @PuneriPaltan bring Mohammadreza Chiyaneh for ₹𝟐.𝟑𝟓 𝐜𝐫𝐨𝐫𝐞𝐬👌 pic.twitter.com/svYiBK1FiP
— ProKabaddi (@ProKabaddi) October 9, 2023
पहिलेच नाव शादलू याचे आल्यानंतर सर्वच संघांनी त्याच्यासाठी बॅटनवर केला. सुरुवातीला यु मुंबा व तेलगू टायटन्स यांच्यामध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, त्याची किंमत दीड कोटींपेक्षा जास्त झाल्यानंतर गुजरात जायंट्स व पुणेरी पलटण यांनी जोर लावला. अखेर पुणेरी पलटणने तब्बल 2 कोटी 35 लाखांची तगडी बोली लावत त्याला आपल्याकडे घेतले. पटना पायरेट्ने त्याच्यासाठी एफबीएम कार्ड न वापरल्याने अखेर तो पुणे संघाकडेच राहिला.
📁#PKLPlayerAuction
└📁Epic Defenders
└📁Fazel Atrachali
└📁@GujaratGiantsFazel Atrachali is now a Giant for INR 1.60 Cr🤩#PKLAuction #PKLSeason10
— ProKabaddi (@ProKabaddi) October 9, 2023
त्यानंतर दुसरा खेळाडू म्हणून इराणचा कर्णधार फजल अत्राचली हा लिलावात आला. त्याच्यावर गुजरात व दिल्ली यांनी मोठी बोली लावली. अखेर एक कोटी 60 लाख या किमतीत तो गुजरात संघाचा भाग बनला.
(Pro Kabaddi 2023 Auction Shadlou Goes To Puneri Paltan In 2 Crore 35 Lakhs Fazel To Gujrat)
महत्वाच्या बातम्या –
VIDEO । नेदर्लंड्सचा गोलंदाज थोडक्यात वाचला, चेंडू न मारल्यामुळे मानले फलंदाजाचे आभार
रोहितने 22 महिन्यांपूर्वी व्यक्त केलेला विश्वास विराट-राहुलने ठरवला सार्थ, वाचा काय म्हणालेला कॅप्टन