---Advertisement---

४३ वर्षीय खेळाडूला यु-मुंबाने प्रो-कबड्डीत मोजले तब्बल ४६ लाख

On: गुरूवार, मे 31, 2018 11:13 AM
---Advertisement---

मुंबई | फिटनेस कसा असवा याचा कबड्डीमध्ये आदर्श घालुन देणाऱ्या धर्मराज चेरलाथन यांना यु-मुंबाने तब्बल ४६ लाख रुपये मोजत संघात कायम घेत आपला बचाव आणखी भक्कम केला.

अण्णा या नावाने कबड्डी जगतात ओळखले जाणारे धर्मराज चेरलाथन हे तेलंगणा राज्यातील असुन त्यांनी वयाच्या ३८व्या वर्षी प्रो-कबड्डीचा पहिला सामना खेळला होता.

पहिले दोन हंगाम बेंगलोर, तिसरा हंगाम तेलुगु, चौथा हंगाम पाटणा तर पाचवा हंगाम ते पुण्याकडून खेळले होते. पुणेरी पलटण संघाकडून खेळलेल्या चेरलाथनसाठी आज पुणे एफबीएम वापरेल असे बोलले जात होते परंतु त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे फजल अत्राचलीबरोबर चेरलाथन मुंबईत आल्यामुळे त्यांची बचाव फळी भक्कम झाली आहे.

७७ सामन्यात त्यांनी आजपर्यंत १७६ गुण टॅकलमधून घेतले आहे. टॅकलमध्ये सर्वाधिक गुण घेणाऱ्या खेळाडूंमध्ये ते ६व्या स्थानी आहेत. ते कोणत्याही काॅर्नरला खेळण्यासाठी ओळखले जातात.

वाचा प्रो-कबड्डी २०१८च्या खास बातम्या- 

-महाराष्ट्राच्या विराज लांडगेला प्रो-कबड्डी लिलावात दुसऱ्या दिवशी पहिली बोली

-संपुर्ण यादी- पहिल्याच दिवशी प्रो-कबड्डी लिलावात 6 खेळाडू करोडपती

-हा खेळाडू ठरला प्रो-कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

-प्रो-कबड्डीत 1 कोटी बोली लागलेला रिशांक देवडिगा पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू

आणि पुणेरी पलटणने लावली या खेळाडूवर तब्बल 1 कोटी 15 लाख रुपयांची बोली

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment