---Advertisement---

बंगाल-बेंगलोर सामना ठरला ऐतिहासिक! नबीबक्षच्या ८ गुणांच्या ‘तांत्रिक’ रेडने बंगालची पुनरागमनासह सरशी

On: गुरूवार, जानेवारी 20, 2022 9:52 PM
---Advertisement---

बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या ६७ व्या सामन्यात ऐतिहासिक असे क्षण पाहायला मिळाले. ड्रामा आणि ॲक्शनने भरपूर बेंगलोर बुल्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स या सामन्यात अखेरीस बंगाल ४०-३९ असा विजय मिळवला.

अत्यंत धीम्या गतीने सुरू झालेल्या या सामन्यात दोन्ही संघ पहिल्या हाफमध्ये संघर्ष करताना दिसले. बेंगलोर चा कर्णधार पवन सहरावत व बंगालचा कर्णधार मनिंदर सिंग हे पहिल्या हाफमध्ये पूर्णतः अपयशी ठरले. पहिल्या हाफच्या अखेरीस बंगालकडे १४-१३ अशी ही नाममात्र आघाडी होती.

दुसऱ्या हाफच्या सुरूवातीपासून बेंगलोरने आक्रमणाला सुरुवात केली. स्वतः कर्णधार पवन सेहरावतने जबाबदारी घेत बंगालला ऑल आउट करण्यात यश मिळवले. सामन्याच्या तिसाव्या मिनिटापर्यंत बेंगलोर २८-२१ असा आघाडीवर होता. मात्र, त्याच वेळी सामन्यात एक ऐतिहासिक क्षण आला. बंगालचा इरानियन रेडर नबीबक्ष हा आपल्या रेडमध्ये स्वतः बाद झाला. मात्र, त्याच्यासोबत संपूर्ण बेंगलोर संघ ऑल आऊट झाला. नबीबक्ष हा कोणत्याही खेळाडूला स्पर्श न करता बाद झाल्याने विरोधी संघाचे ७ खेळाडू व एक बोनस असे आठ गुण या रेडमध्ये बंगालला मिळाले.

तांत्रिक गुणांच्या जोरावर मिळालेल्या आघाडी बंगाल संघाने अजिबात गमावली नाही. या परिस्थितीने काहीशा गोंधळलेल्या बेंगलोरने सामन्यात पुनरागमनाचे प्रयत्न केले. मात्र, सातत्याने ४-५ गुणांची आघाडी टिकवून ठेवलेल्या बंगालच्या पुढे जाण्यात त्यांना अपयश आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---