बेंगलोर येथे प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगाम सुरू आहे. या हंगामाच्या सातव्या दिवशी दुसऱ्या सामन्यात तेलगू टायटन्स आणि हरियाणा स्टीलर्स संघ भिडले. दोन्ही संघातील खेळाडूंनी अतिशय चमकदार खेळ दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली. या सामन्यात हरियाणा संघाने ३९-३७ असा विजय मिळवला.
सुरेंदर नाडाच्या नेतृत्वातील हरियाणा संघाने पहिल्या हाफमध्ये जोरदार कामगिरी केली. अष्टपैलू रोहित गुलिया याने ७ गुण कमावत संघाला आघाडीवर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पहिल्या हाफच्या अखेरीनंतर हरियाणा संघाकडे २३-१९ अशी आघाडी होती.
दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला पुन्हा एकदा हरियाणा संघाने आपले वर्चस्व कायम राखले. रोहितसह युवा रेडर मीतू याने तेलगू संघाचा डिफेन्स हलविला. त्यानेदेखील आपला सुपर टेन पूर्ण केला. कर्णधार सुरेंदर नाडाने शानदार पकडी करत बचावाचे नेतृत्व केले. तेलुगु टायटन्ससाठी अंकित बेनीवाल याने एकहाती किल्ला लढविला.
याआधी झालेल्या पहिल्या सामन्यात पटना पायरेट्सने पुणेरी पलटणचे आव्हान मोडीत काढले. पटनासाठी सचिन तंवर याने रेडींगमध्ये तर रेझाने बचावामध्ये अप्रतिम कामगिरी केली.