– शरद बोदगे
प्रो-कबड्डीमध्ये तमाम कबड्डी शौकीन यावेळी एका गोष्टीची आतुरतेने वाट पहात होते, ती गोष्ट म्हणजे ६व्या हंगामासाठी होणारा लिलाव. अनेक कबड्डी तज्ञ, खेळाडू आणि या खेळावर जिवापाड प्रेम करणारे चाहत्यांचा अंदाज होता की एकातरी खेळाडूला यावर्षी लिलावात १ कोटी रुपये मिळतील.
हे सर्व अंदाज खरे तर ठरले परंतु एक नाही तर तब्बल ६ खेळाडू या लिलावात करोडपती झाले. त्यातील सेकंड रेडर म्हणुन कबड्डी जगतात मोठं नाव असलेल्या मोनु गोयातला हरियाणा स्टीलर्सने चक्क १ कोटी ५१ लाख रुपयांची बोली लावली.
याबरोबर अनेकांच्या लक्षात आला नाही परंतु एक खास विक्रमही झाला. भारतात क्रिकेट सोडून कोणत्याही खेळात एखाद्या खेळाडूला मिळालेली ही सर्वाधिक मोठी रक्कम होती. अगदी फुटबाॅल आणि बॅडमिंटनपेक्षाही जास्त.
प्रो-कबड्डी २०१८ लिलावात या खेळाडूंना लागल्या सर्वात्तम बोली
१ कोटी ५१ लाख- मोनु गोयत,हरियाना स्टीलर्स
१ कोटी २९ लाख- राहुल चौधरी, तेलुगु टायटन्स (एफबीएम)
१ कोटी १५ लाख- दिपक निवास हुडा, जयपुर पिंक पॅंथर
१ कोटी १५ लाख- रिशांक देवडिगा, युपी योद्धाज (एफबीएम)
१ कोटी ०० लाख- फजल अत्राचली, यु मुम्बा
क्रिकेट सोडून भारतात फुटबाॅल, बॅडमिंटन, कुस्ती, टेनिस, टेबल टेनिस आणि मोटोक्राॅस सारख्या खेळांच्या लीग होतात. त्यात भारताबरोबर अन्य देशांतील खेळाडूही भाग घेतात.
या सर्व लीगमधील महाग खेळाडू होण्याचा मान आता कबड्डीकडे आला आहे. कारण यापुर्वी क्रिकेटेतर खेळांमध्ये फूटबाॅलपटू सुनिल छेत्री हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्याला २०१७-१८च्या हंगामासाठी बेंगलुरु एफसीने १ कोटी ५०लाखांना संघात घेतले होते. त्याच्यापेक्षा मोनु गोयतला १ लाख रुपये यावर्षीच्या हंगामात जास्त मिळाले आहेत.
इंडियन सुपर लीगमधील सर्वात महागडे खेळाडू हंगाम-४
१ कोटी ५० लाख- सुनिल छेत्री, बेंगलुरु एफसी
१ कोटी ३० लाख- जेजे लालपेकलुवा, चेन्नईयान एफसी
१ कोटी ३० लाख- संदेश झिंगन, चेन्नईयान एफसी
१ कोटी २० लाख- मुंबई सिटी एफसी, अमरिंदर सिंग
प्रो रेस्टलिंग लीग हंगाम- ३
५५ लाख- सुशिल कुमार, दिल्ली सुलतान
४० लाख- विनेश फोगाट, युपी दंगल
३९ लाख- साक्षी मलिक, मुंबई महारथी
२८ लाख- गीता फोगट, युपी दंगल
प्रिमीयर बॅडमिंटन लीग हंगाम- ३
६२ लाख- एचएस प्रणाॅय, अहमदाबाद स्मॅशमास्टर्स
५६.१०लाख- किदांबी श्रिकांत, अवध वाॅरियर्स
४८.७५- पीव्ही सिंधू, चेन्नई स्मॅशर्स
क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे आयपीएल लिलावात क्रिकेटर्सवर मोठ्या प्रमाणात बोली लागल्या.
इंडियन प्रिमीयर लीग हंगाम- ११
१७ कोटी- विराट कोहली, राॅयल चॅलेंजर बेंगलोर
१५ कोटी- रिषभ पंत, दिल्ली डेअरडेविल्स
१५ कोटी- एमएस धोनी, चेन्नई सुपरकिंग्ज
१५ कोटी- रोहित शर्मा- मुंबई इंडियन्स