पुणे | प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात आज विक्रमांची बरसात होणार आहे. तमिल थलाईवाजचा अजय ठाकूर तसेच तेलुगू टायटन्सचा राहुल चौधरीला आज मोठे पराक्रम करण्याची संधी आहे.
आज प्रो कबड्डीत दोन सामने होणार आहेत. त्यातील पहिल्या सामन्यात यु मुंबा विरुद्ध तेलुगू टायटन्स अशी लढत पहालयला मिळेल. याच सामन्यात तेलुगू टायटन्सचा कर्णधार राहुल चौधरीला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.
त्याने या सामन्यात जर ७ गुण रेडमधून घेतले तर प्रो कबड्डी इतिहासात ७०० गुण रेडमधून घेणारा तो पहिला खेळाडू ठरणार आहे. राहुलने आजपर्यंत ८३ सामन्यात ६९३ गुण घेतले आहेत.
दुसरा सामना हा तमिल थलाईवाज विरुद्ध पुणेरी पलटन असा होणार आहे. या सामन्यात तमिल थलाईवाजचा कर्णधार अजय ठाकूरला प्रो कबड्डीत ६०० गुण केवळ रेडमधून घेण्याची संधी आहे. त्याने ८६ सामन्यात ५९७ गुण घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–दुसरा वनडे सामना टीम इंडियासाठी ठरणार ऐतिहासिक
–हरभजनने केले विंडीजच्या फलंदाजाबद्दल मोठे भाकित