---Advertisement---

प्रो कबड्डी: परदीपने रचला इतिहास! गाठला 1500 गुणांचा टप्पा; तमिल-युपीचे विजय

---Advertisement---

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात सोमवारी (21 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात तमिल थलाईवाजने अखेरच्या एका मिनिटात बाजी पलटवताना बंगाल वॉरियर्सला 35-30 असे पराभूत केले. तर, अखेरच्या रेडपर्यंत गेलेल्या दुसऱ्या सामन्यात युपीने गुजरात जायंट्सला 35-31 अशा चार गुणांचा फरकाने नमवले.

https://twitter.com/ProKabaddi/status/1594715847230361605?t=eZGIH5kjq5Y-qKPNjzTp-Q&s=19

 

हैदराबाद येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दिवसातील दुसरा सामना यूपी योद्धाज विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात युपीने अतिशय धमाकेदार सुरुवात केली. स्टार रेडर परदीप नरवाल याच्या करिष्याच्या जोरावर त्यांनी 12-4 अशी आघाडी मिळवलेली. यादरम्यान परदीपने प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात 1500 रेडिंग गुण पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो पहिला कबड्डीपटू ठरला. पहिल्या सत्राच्या अखेरीस युपीकडे आठ गुणांची आघाडी होती. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये गुजरातने जोरदार पलटवार केला.‌ युवा रेडर प्रतीक दही याने शानदार खेळ दाखवत सुपर टेन पूर्ण केला. कर्णधार चंद्रन रणजीतने खेळात सातत्य दाखवत त्याला योग्य साथ दिली. एक वेळेस सामना 30-30 असा बरोबरीत असताना युपीने 35-31 असा विजय संपादन केला.

तत्पूर्वी, दिवसातील पहिल्या सामन्यात तमिल थलायवाज व बंगाल वॉरियर्स हे संघ आमनेसामने आले. तुल्यबळ संघातील हा सामना अतिशय रोमांचक ठरला. तमिल थलायवाजसाठी नरेंदर गेहलोत व बंगाल साठी कर्णधार मनिंदर सिंग यांनी प्रयत्नांची शर्थ करत सुपर टेन पूर्ण केले. अखेरच्या एका मिनिटात सामना बरोबर येत असताना, तमिलने दोन रेडमध्ये पाच गुणांची कमाई करत सामन्यात 35-30 असा विजय मिळवला. सागर राठीने मोक्याच्या क्षणी मनिंदरला बाद केल्याने बंगालला पराभव स्वीकारावा लागला.

(Pro Kabaddi Pardeep Narwal Complete 1500 Points)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारतीय म्हणतात दिग्गज, पण आपलेच काढतात इज्जत’, पाकिस्तानच्या माजी दिग्गजाचे दु:ख आले बाहेर
अरुणाचल प्रदेशची असामान्य कामगिरी! लिस्ट ए क्रिकेटमध्ये रचला जगात कुणालाच न जमलेला विक्रम  

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---