कोरोना व्हायरसने (Coronaviras) जगात थैमान घातले आहे. त्यामुळे भारतातही २५ मार्च २०२० पासून लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आलं आहे. पण लॉकडाऊनमुळे गरीब जनतेला मोठा प्रश्न पडला आहे. रोज कमावून खाणाऱ्या या लोकांना कोणताही रोजगार नसल्याने जेवणही मिळत नाही. अशाच गरीब लोकांसाठी अनेक संस्था व मंडळ पुढाकार घेऊन त्यांना जेवण पुरवत आहे.
मुंबई वडाळा येथील एस. एस. जी. फाऊंडेशनकडून तेथील गरीब लोकांना जेवणाचे वाटप करण्यात येत आहे. एस. एस. जी. फाऊंडेशन हा राष्ट्रीय कबड्डीपटू पंकज मोहितेचा (Pankaj Mohite) स्थानिक संघ आहे. पंकज मोहिते मुंबई शहर मध्य या संघाचे प्रतिनिधित्व करतो. लॉकडाऊनच्या काळात गरीब लोकांना पंकज मोहिते व त्याच्या संघाकडून या गरीब लोकांना जेवणाचे वाटप करण्यात आले आहे.
https://www.instagram.com/p/B-exGKOpcLa/?utm_source=ig_web_copy_link
पंकज मोहिते हा महाराष्ट्रातील आघाडीचा चढाईपटू आहे. पंकज मोहितेने यावर्षी महाराष्ट्र पुरुष संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. प्रो कबड्डीच्या (Pro Kabaddi) सातव्या मोसमात पंकज मोहितेने प्रो कबड्डीत पुणेरी पलटण संघाकडून प्रदार्पण केलं आहे.