प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात सोमवारी (14 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात पुणेरी पलटणने बंगाल वॉरियर्सला 43-27 असे पराभूत करत आपले अव्वलस्थान मजबूत केले. तर दिवसातील दुसऱ्या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने गुजरात जायंट्सचा 33-332 असा केवळ एका गुणाने पराभव केला.
#BhaariAttack >>>>>>> Jordaar 👊
And it's 2 out of 2 for Paltan 🆚 the Warriors in Season 9#vivoProKabaddi #FantasticPanga #BENvPUN pic.twitter.com/FvSiZS8WSI
— ProKabaddi (@ProKabaddi) November 14, 2022
पुण्याजवळील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सोमवारी पहिला सामना गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी असलेल्या पुणेरी पलटण व बंगाल वारियर्स यांच्या दरम्यान झाला. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या पुणे संघाने प्रेक्षकांच्या जोरदार पाठिंब्याने सुरुवात केली. आकाश शिंदे व अस्लम इनामदार या पुण्याच्या स्थानिक खेळाडूंनी तुफानी कामगिरी करत पहिल्या सत्रातच बंगालला सामन्यात मागे ढकलले. पहिल्या सत्राच्या अखेरीसच पुणे संघाने 24-13 अशी 11 गुणांची मोठी आघाडी मिळवली.
दुसऱ्या सत्राचे त्यांनी आपले आक्रमण सुरूच ठेवले. त्यांना मोहित गोयतची शानदार साथ मिळाली. फझल अत्राचलीच्या नेतृत्वात इतर डिफेंडरने देखील उत्कृष्ट खेळ दाखवला. बंगाल संघासाठी एकट्या कर्णधार मनिंदर सिंगने 14 गुण कमावले. पुणे संघासाठी आकाशने 10, अस्लमने 9 तर मोहितने 8 गुणांची कमाई केली. पूर्ण वेळेनंतर पुणे संघाने 43-27 असा विजय साजरा केला. यासह पुणे संघ पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचला.
दिवसातील दुसरा सामना हरियाणा स्टीलर्स व गुजरात जायंट्स यांच्या दरम्यान खेळला गेला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी चुरशीचा खेळ दाखवला. गुजरातसाठी चंद्रन रणजीत व एचएस राकेश यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र, हरियाणासाठी एकट्या मनजीतने 14 गुण कमावले. या विजयाने हरियाणा संघ आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकीकडे पाकिस्तानी पत्रकाराचे ट्वीट, तर दुसरीकडे मिश्राजींचा ‘विराट’ रिप्लाय, ‘अशी’ केली बोलती बंद
विश्वचषक तर जिंकलाच, पण आता आयपीएलही जिंकायला निघाला इंग्लंडचा ‘हा’ पठ्ठ्या; म्हणाला, ‘मी आता…’