---Advertisement---

प्रो कबड्डी: महाराष्ट्रीयन डर्बी पुण्याच्या नावे! पलटणचा हंगामातील पहिला विजय

On: रविवार, ऑक्टोबर 16, 2022 8:37 PM
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग 2022 (Pro Kabaddi 2022) मध्ये रविवारी (16 ऑक्टोबर) पहिला सामना महाराष्ट्रीयन डर्बीचा खेळला गेला. यु मुंबा विरुद्ध पुणेरी पलटण अशा झालेल्या या रोमांचक सामन्यात प्रेक्षकांना वेगवान खेळाची मेजवानी मिळाली. अखेरीस पुणेरी पलटणने सामन्यात 30-28 असा विजय मिळवला.

स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या सामन्यांपैकी असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी वेगवान सुरुवात केली. मुंबईसाठी गुमान सिंह तर पुणे संघासाठी इराणीयन नबीबक्ष यांनी प्रथम गुण मिळवले. पहिल्या दहा मिनिटांपर्यंत पुणे संघ ऑल आउट होण्याच्या जवळ आला होता. मात्र, डिफेन्सने वेळीच चमक दाखवत संघाला पिछाडीवर पडू दिले नाहीत. पहिल्या सत्राच्या अखेरीस पुणे संघाने 14-13 अशी नाममात्र आघाडी घेतली. नबीबक्ष, अस्लम इनामदार व मोहित गोयत या तीनही रेडर्सनी प्रत्येकी तीन गुण मिळवले. कर्णधार फजल अत्राचलीनेही 3 गुण घेत साथ दिली. मुंबईसाठी गुमानने 5 गुण कमावले.

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीपासून यु मुंबा संघ चार किंवा चार पेक्षा कमी खेळाडूंसह खेळत होता. मात्र, पुणे संघटना ऑल आऊट करण्यात यशस्वी होत नव्हता. अखेर दुसऱ्या सत्राच्या 11 व्या मिनिटाला त्यांना यश आले. त्यामुळे पुणे संघाला महत्त्वपूर्ण चार गुणांची आघाडी मिळाली. अखेरच्या काही मिनिटात मुंबईने सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, पुण्याच्या खेळाडूंनी कमालीचा संयम दाखवत 2 गुणांनी विजय आपल्या खात्यावर जमा केला. अस्लम इनामदार पुणे संघासाठी सर्वाधिक 9  गुण मिळवणारा खेळाडू ठरला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात नेदरलँड्सचा दमदार विजय, यूएईचा 3 विकेट्सने पराभव
नादच खुळा! 11 वर्षीय चिमुकल्याच्या बॉलिंगचा रोहित बनला फॅन, नेट्समध्ये केला त्याचा सामना 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---