प्रो कबड्डीचे पाचवे पर्व आता लवकरच सुरु होणार आहे. सर्वांना उत्सुकता लागली आहे की हे पर्वही मागील पर्वाप्रमाणे धमाकेदार होणार का ते पाहण्याची? मागील दोनही मोसमात पाटणा पायरेट्सने प्रो कबड्डीचा चषक जिंकला आहे.
दरवर्षी मुंबईला आपल्या चाहत्यांकडून बरेच प्रोत्साहन मिळते आणि हे फक्त मैदानावरच नाही तर सोशल मीडियावरही आहे. अनुप कुमार आणि मुंबईच्या लोकप्रियतेमुळे सोशल मीडियावर यु मुंबाचा बोलबाला आहे आणि ट्विटरवर किंग यू मुंबाच आहे.
क्रमवारी (ट्विटर फॉलोवर्स):-
१. यु मुंबा – ७६,९००
२. जयपूर पिंक पँथर्स – ७६,२००
३. पुणेरी पलटण – ४८,५००
४. पाटणा पायरेट्स – ४५,२००
५. तेलगू टायटन्स बंगाल वोरीयर्स – ३४,४००
६. बंगळुरू बुल्स – ३१,८००
७. बंगाल वोरीयर्स – ३१,८००
८. दबंग दिल्ली – ३१,१००
९. तामिल थलइवा – ३,९६५
१०. हरियाणा – १,१५०
११. गुजरात फॉरचूनजायन्ट – ४५२
१२. उत्तर प्रदेश – ६३
प्रो कबड्डीच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटला १,३०,००० फॉलोवर्स आहेत.
हरियाणा, तामिळ, उत्तर परदेश आणि गुजरात या संघाना कमी फॉलव्हर्स आहेत कारण हे संघ याच वर्षीच प्रो कबड्डीमध्ये सामील झाले आहेत. मुंबई आणि पुण्यामधील चुरस येथे ही दिसून येते पण फेसबुक वर जरी पुणेरी पालटणला जास्त लाईक्स असले तरी ट्विटरवर मात्र मुंबईने बाजी मारली आहे.