---Advertisement---

प्रो कबड्डी: एकाच दिवसात सलग दुसरा सामना टाय; पवनच्या दुखापतीनंतर थलायवाजचा झुंजार खेळ

On: शनिवार, ऑक्टोबर 8, 2022 9:46 PM
---Advertisement---

प्रो कबड्डी 2022 च्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि तमिल थलाईवाज हे संघ आमने-सामने आले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी 31-31 अशा बरोबरी समाधान मानले. नरेंदर व राकेश आपापल्या संघासाठी नायक ठरले.

सुपरस्टार पवन सेहरावत याच्या नेतृत्वात प्रथमच उतरत असलेल्या तमिल थलाईवाजने चांगली सुरुवात केली. पहिल्या दहा मिनिटात खेळ अत्यंत चुरशीचा झाला. मात्र, दहाव्या मिनिटाला पवन दुखापतग्रस्त झाल्याने मैदानाबाहेर बाहेर गेला. तरीदेखील तमिल थलाईवाजने संयम दाखवत पहिल्या सत्राच्या शेवटी 16-18 अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रात फारसा आक्रमक खेळ झाला नाही. तमिल थलाईवाज सातत्याने दोन-तीन गुणांच्या फरकाने आघाडीवर राहिला. एक मिनिटांपेक्षा काहीसा वेळ शिल्लक असताना गुजरातच्या राकेशने दोन गुण मिळवत सामना बरोबरीत आणला. अखेरच्या मिनिटात दोन्ही संघांनी रिस्क न घेतल्याने सामना बरोबरीत सुटला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---