२३-१७
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ७१ व्या सामन्यात यु मुंबाची गाठ अखेरच्या स्थानावर असलेल्या तेलगू टायटन्सशी झाला. सामन्याच्या सुरुवातीला मुंबई संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवल्यानंतर टायटन्सने शानदार पुनरागमन केले. अखेरीस, यु मुंबाने आपला खेळ उंचावत या सामन्यात ४२-३५ असा विजय मिळवला.
मागील सामन्यात स्पर्धेतील आपला पहिला विजय मिळवलेल्या तेलगू संघासाठी हा सामना पुन्हा एकदा निराशाजनकरीत्या सुरु झाला. मुंबईने अवघ्या ७ मिनिटात तेलगू संघाला ऑल आउट करण्यात यश मिळवले. त्यांनी १०-१ अशी आघाडी मिळवली होती. मात्र, त्यानंतर तेलगू संघाने जबरदस्त पुनरागमन करत मुंबईला ऑल आऊट करण्यात यश मिळवले. पहिल्या हाफच्या अखेरीस मुंबई संघाकडे २३-१७ अशी आघाडी होती.
पहिल्या हाफप्रमाणे दुसऱ्या हाफमध्येही मुंबईने वेगवान सुरुवात केली. मात्र, यावेळी त्यांनी हाराकिरी केली नाही. त्यांनी आघाडी उत्तरोत्तर वाढवत ठेवली. रेडींगमध्ये अभिषेक सिंग व डिफेन्स मध्ये कर्णधार फजल अत्राचली यांनी अनुक्रमे सुपर टेन व हाय फाईव पूर्ण करत संघाला पुढे नेले. तेलगू संघासाठी अगस्त्या, रजनीश व संदीप कंडोलाने गुण घेत सामन्यात पुनरागमनाचा अयशस्वी प्रयत्न केला.






