प्रो कबड्डीच्या सीझन ४ च्या प्रचंड यशानंतर मशाल स्पोर्ट्स आणि स्टार इंडिया प्रो कबड्डीच्या चाहत्यांसाठी अजून ४ संघाची मेजवानी घेऊन येत आहे. हे नवीन चार संघ तामिळनाडू,गुजरात उत्तर प्रदेश हरियाणा असे आहेत. या संघाचे मालक अनुक्रमे एन प्रसाद आणि सचिन तेंडुलकर, अदानी ग्रुप, जी एम आर ग्रुप, जे एस डब्लू, असे आहेत. प्रो कबड्डीत याआधी ८ संघ ७ राज्यांचे नेतृत्व करत होते( दिल्ली, पुणे, मुंबई, पटणा, जयपूर, कोलकाता,बेंगलुरू,हैद्राबात ), तर आता सिझन ५ मध्ये प्रो कबड्डीत १२ संघ ११ राज्यांचे नेतृत्व करणार आहेत. प्रो कबड्डीचे सामने हे ११ राज्यांमध्ये एकूण १३० सामने होणार आहेत. यासाठीचा कालावधी ३ महिन्यांचा ( जुलै – ऑक्टोबर ) असून प्रो कबड्डी आज देशातील सर्वाधिक लोकप्रिय असा खेळ झाला आहे.
भारतात कबड्डीचा वाढता प्रतिसाद पाहता गतवर्षी कबड्डीचा वर्ल्ड कप हा भारतात आयोजित करण्यात आला होता. तो भारतानेच जिंकला यावरून भारतात कबड्डीच्या चाहत्यांमध्ये अधिकाधिक वाढ होत आहे.
PKL हे IPL वर भारी पडत असून तुलना केल्यास प्रो कबड्डी आज IPL पेक्षा वरचढ दिसून येते. IPL चे ८ संघ असून ७ राज्यांचे नेतृत्व करतात आणि आज PKL चे १२ संघ असून ११ राज्यांचे नेतृत्व करत आहेत. IPL ७च राज्यात खेळली जाते तर PKL ११ राज्यात खेळली जाणार आहे.